Saturday, 11 April 2026

झोपडपट्टी प्राधिकरणाशी संबंधितांना त्यांच्या कामासाठी कार्यालयात

 बृहन्मुंबई महापालिकेकडील झोपडपट्टी प्राधिकरणात कार्यरत असणाऱ्या अभियंत्यांची सेवा प्राधिकरणात समाजोयित करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. एकूण आकृतीबंधाच्या ३० टक्के इतक्या पदांचे समायोजन करण्यात यावेअसेही यावेळी ठरविण्यात आले.

 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीझोपडपट्टी प्राधिकरणाशी संबंधितांना त्यांच्या कामासाठी कार्यालयात यायची गरज पडू नयेयासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर यंत्रणा उभारण्यात यावी. तसेच स्वयंचलित विकास नियंत्रण नियम तपासणी ( Auto DCR) प्रणालीमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) चा वापर करून संपूर्ण प्रक्रिया मानवी हस्तक्षेप विरहित करावी. ही प्रणाली २४×७ सुरू रहावी. म्हाडाबृहन्मुंबई महापालिकांमध्येही अशी प्रणाली विकसित करण्यात यावे.

‘झोपु’ प्राधिकरणाच्या नेत्रम प्रकल्पाचे कौतुक

 झोपु’ प्राधिकरणाच्या नेत्रम प्रकल्पाचे कौतुक

झोपडपट्टी प्राधिकरणाच्या वतीने बेकायदेशीर अतिक्रमणाला आळा बसावाअतिक्रमणाबाबत माहिती मिळावीयासाठी प्रधानमंत्री गतीशक्ति अभियांनाअंतर्गत नेत्रम’ ही संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. याद्वारे सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून मुंबईतील अतिक्रमणांवर लक्ष ठेवण्यात येते. तसेच अतिक्रमण होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना त्याची माहिती दिली जाते. अतिक्रमण रोखण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची असल्याचे सांगून या उपक्रमाचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कौतुक केले. नेत्रम’ द्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अतिक्रमण दूर करण्याच्या कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील कंत्राटी चतुर्थ श्रेणी कर्मचारीवर्ग यांना कायमस्वरूपी नियुक्ती करण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.

, प्राधिकरणाच्या वतीने माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार २२ कामकाज प्रणाली

 यावेळी डॉ. कल्याणकर यांनी सांगितले कीप्राधिकरणाच्या वतीने माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार २२ कामकाज प्रणाली डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात  आल्या आहेत. तसेच इज ऑफ ड्युइंग बिझनेसअंतर्गत भाड्याची थकबाकीची वसुली मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पात राहणाऱ्या अनधिकृत व्यक्तिंना बाहेर काढण्याची कारवाई गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात करण्यात आली. तसेच अनधिकृत झोपडपट्ट्यांवरही मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे.

००००

२०२५ मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या राज्य गृहनिर्माण धोरण २०२५ अनुषंगाने शासना मार्फत

 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या संयुक्त भागीदारी प्रकल्पांना मिळणारा अल्प प्रतिसादरखडलेले प्रकल्पअव्यवहार्य योजना यांचा विचार करता शासनामार्फत सन २०२५ मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या राज्य गृहनिर्माण धोरण २०२५ अनुषंगाने शासना मार्फत अंमलांत आणलेल्या झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत समुह क्षेत्रांचा एकात्मिक व शाश्वत विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ५० एकर किंवा त्यापेक्षा अधिकच्या भूखंडावरील प्रकल्प हे योजनेमध्ये पुनर्विकसीत करण्याचा निर्णय झाला असून त्याबाबत प्राधिकरणामार्फत समूह क्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहेयाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या योजनेअंतर्गत अंदाजे ६ ते ७ लाख झोपडी धारकांना पुनर्वसनाचा लाभ होणार आहे.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामास गती द्या

 लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामास गती द्या

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी प्राधिकरणाची १६ वी बैठक संपन्न

 

मुंबई दि. १० : घाटकोपर येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी ३३२.६२ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या अपात्र झोपडीधारकांना सुद्धा भाडेतत्वावरील घरे योजनेतर्गत घरे देण्यात यावीत. तसेच स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणबृहन्मुंबई (एसआरए) ची १६ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा हस्ते प्राधिकरण कार्यालयातील विविध कक्षांचे ऑनलाइन उ‌द्घाटन झाले. झोपुप्राबृहन्मुंबईने संपादित केलेल्या "बृहन्मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे" या पुस्तकाचे आणि प्राधिकरणाच्या दिनदर्शिकेचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

शिबिरात नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा थेट लाभ घेतला

 शिबिरात विविध शासकीय दाखले७/१२ उतारेआधार नोंदणीरेशनिंगसंबंधित प्रलंबित कामे तसेच विविध योजनांचे अर्ज स्विकारून अनेक प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली. तसेच ‘संगांयो’ श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना व आयुष्यमान भारत कार्डाचे वितरण करण्यात आले. यावेळी महसूल विभागनगर भूमापन कार्यालयबृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागशिधावाटप कार्यालयमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)महिला बचत गटसमाज कल्याण विभागया कार्यालयांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात आले.

शिबिरात नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा थेट लाभ घेतला. मुंबई उपनगर जिल्हयातील लोकसभा सदस्य व विधानसभा सदस्य यांनी उपक्रमाची पाहणी केली. प्रातिनिधीक स्वरुपात विविध प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शिबिरांतर्गत एकूण २६३५ प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आलेले आहेत. प्रशासनाने शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या या लोकाभिमुख उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.

नागरिकांना महसूल विषयक सेवा जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रामध्ये "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना महसूल विषयक सेवा जलदपारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. या अभियानांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत असून प्रलंबित महसूल प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या महसूल विषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी गावपातळीवर तसेच कार्यालयीन स्तरावर विशेष प्रयत्न करत आहेत.

Featured post

Lakshvedhi