‘झोपु’ प्राधिकरणाच्या नेत्रम प्रकल्पाचे कौतुक
झोपडपट्टी प्राधिकरणाच्या वतीने बेकायदेशीर अतिक्रमणाला आळा बसावा, अतिक्रमणाबाबत माहिती मिळावी, यासाठी प्रधानमंत्री गतीशक्ति अभियांनाअंतर्गत ‘नेत्रम’ ही संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. याद्वारे सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून मुंबईतील अतिक्रमणांवर लक्ष ठेवण्यात येते. तसेच अतिक्रमण होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना त्याची माहिती दिली जाते. अतिक्रमण रोखण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची असल्याचे सांगून या उपक्रमाचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कौतुक केले. ‘नेत्रम’ द्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अतिक्रमण दूर करण्याच्या कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील कंत्राटी चतुर्थ श्रेणी कर्मचारीवर्ग यांना कायमस्वरूपी नियुक्ती करण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
No comments:
Post a Comment