लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामास गती द्या
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी प्राधिकरणाची १६ वी बैठक संपन्न
मुंबई दि. १० : घाटकोपर येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी ३३२.६२ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या अपात्र झोपडीधारकांना सुद्धा भाडेतत्वावरील घरे योजनेतर्गत घरे देण्यात यावीत. तसेच स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) ची १६ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा हस्ते प्राधिकरण कार्यालयातील विविध कक्षांचे ऑनलाइन उद्घाटन झाले. झोपुप्रा, बृहन्मुंबईने संपादित केलेल्या "बृहन्मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे" या पुस्तकाचे आणि प्राधिकरणाच्या दिनदर्शिकेचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
No comments:
Post a Comment