शिबिरात विविध शासकीय दाखले, ७/१२ उतारे, आधार नोंदणी, रेशनिंगसंबंधित प्रलंबित कामे तसेच विविध योजनांचे अर्ज स्विकारून अनेक प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली. तसेच ‘संगांयो’ श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना व आयुष्यमान भारत कार्डाचे वितरण करण्यात आले. यावेळी महसूल विभाग, नगर भूमापन कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग, शिधावाटप कार्यालय, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), महिला बचत गट, समाज कल्याण विभाग, या कार्यालयांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात आले.
शिबिरात नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा थेट लाभ घेतला. मुंबई उपनगर जिल्हयातील लोकसभा सदस्य व विधानसभा सदस्य यांनी उपक्रमाची पाहणी केली. प्रातिनिधीक स्वरुपात विविध प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शिबिरांतर्गत एकूण २६३५ प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आलेले आहेत. प्रशासनाने शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या या लोकाभिमुख उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment