Saturday, 14 March 2026

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा

-      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारकाबाबत पुनर्वसन बैठक

मुंबईदि. १३: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित यंत्रणांनी  कायमस्वरूपी तोडगा काढावा. पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जवळील जागांची पडताळणी करून पुनर्वसनासंदर्भात नियोजन करावे. निश्चित कालावधीत उद्यानाची हद्द निश्चित करून हद्दीवरील नागरिकांचे प्राधान्याने पुनर्वसन करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात आयोजित बैठकीत दिले.

उद्यानातील अतिक्रमणधारकांना पुनर्वसन होईपर्यंत मानवीय दृष्टिकोनातून मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुलुंड आणि ठाणे बाजूकडील अतिक्रमणधारकांनाही पुनर्वसनासाठी त्या बाजूकडील जागांचा शोध घेऊन नियोजन करावेअसे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

नाशिक येथील काळाराम मंदिराचे काम करताना

 नाशिक येथील काळाराम मंदिराचे काम करताना आजूबाजूच्या वाहतुकीला अडथळा होणार नाहीयाबाबत दक्षता घेण्यात यावी. राम काल पथाच्या कामाला गती देण्यात यावी. शहरातील ऑप्टिकल फायबर केबलचे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील नादुरुस्त सीसीटीव्ही बाबत पडताळणी करून नवीन सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी. अमृत स्नानांच्या दरम्यान शहरातील भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयांमधील जागा पार्किंग तसेच पोलिसांसाठी घेण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घ्यावा. निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या कामांचा समावेश करून पुढील कार्यवाही करण्यात यावी. नाशिक शहर व परिसरातील जवळपास दोन ते चार हजार मुलांना कुंभमेळ्याच्या निमित्ताने आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी प्रेरित करावे. महिला बचत गटांच्या कुंभमेळातील समावेशनाबाबत पडताळणी करून तशा पद्धतीचे बिझनेस मॉडेल उभारावेअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

काम करण्यात यावे. शिर्डी व शनिशिंगणापूरला निश्चितपणे

 कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी व शनिशिंगणापूरला निश्चितपणे जाणार आहेत. त्यामुळे शिर्डी ते नाशिक रस्त्याचे काम करण्यात यावे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना संपर्कामध्ये कुठलीही अडचण होऊ नयेम्हणून मोबाईल संपर्काची व्यवस्था भक्कम असावी. त्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात यावी. द्वारका जंक्शन येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये अंतर्गत रस्त्यांचा विचार करून परिसरातील रस्त्यांचा एकीकृत विकास करावा. नवीन घाटांच्या जागेकरिता शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावायासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त व नाशिक येथील गोदावरी नदीतील पाणी कुंभमेळा दरम्यान शुद्ध राहण्यासाठी यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावीअसे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

कुंभमेळा निमित्ताने करण्यात येणाऱ्या कामांकरिता लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेकुंभमेळा निमित्ताने करण्यात येणाऱ्या कामांकरिता लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. नाशिक वर्तुळ मार्गातील अडथळे दूर करीत विशेष बाब म्हणून ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. कुंभमध्ये स्वच्छता अत्यंत महत्वाची असून या कामांमध्ये करण्यात येणारी शौचालय दर्जेदार असावी. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या परिसरातील स्थानकांची पायाभूत सुविधांची कामे रेल्वेच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये निफाड रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात यावायाबाबत रेल्वेने पडताळणी करून कार्यवाही करावी.

त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा

 त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

•       नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शिखर समिती बैठक

 

मुंबईदि १३: त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताची पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब  सोबत नेणार आहे. त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

त्र्यंबक-नाशिक सिंहस्थ कुंभमेळाकरिता करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात आयोजित कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ५ हजार १४० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ हजार ४१ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. कुंभमेळा निमित्त सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कुणी वाईट हेतूने किंवा मुद्दाम विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेलतर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतीलअसा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. 

महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक आणि पदभार समारंभ खारघरमध्ये आयोजित२२ मार्च २०२६

 महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक आणि पदभार समारंभ खारघरमध्ये आयोजित

महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या वतीने आगामी २२ मार्च २०२६ रोजी कार्यकारिणी बैठक आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदभार ग्रहण समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पालघर येथून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम लेवेगुजर स्नेहवर्धक मंडळ (मुंबई) आणि कराडी समाज यांच्या सहकार्याने खारघर, नवी मुंबई येथे पार पडणार आहे. समितीचे अध्यक्ष श्री. श्रावण फरकाडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ३३ ओबीसी जातीसमूहांचे प्रमुख प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचा मुख्य उद्देश संघटनेची भविष्यातील रणनीती ठरवणे आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवणे हा आहे.
हा सोहळा रविवार, २२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत लेवे गुजर भवन, सेक्टर २७, प्लॉट नंबर ५७, रंजनपाडा, श्रीराम मंदिराच्या मागे, पेठपाडा मेट्रो स्टेशनजवळ, खारघर, पनवेल येथे संपन्न होईल. निमंत्रण पत्रिकेनुसार, ज्या पदाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवला जाणार आहे, त्यामध्ये अध्यक्ष श्री. श्रावण फरकाडे, कार्याध्यक्ष श्री. राम खरपुरिया, संपर्क प्रमुख श्री. नरेंद्र बडगुजर, सरचिटणीस श्री. मोरेश्वर भादे, सचिव श्री. दीपक नेवे, कोषाध्यक्ष श्री. मुकुंद मुसले, सहसचिव श्री. भूषण कडेकर, श्री. प्रल्हाद कासकर, श्री. शांताराम गुजर, तसेच सहकोषाध्यक्ष श्री. विकास संसारे आणि श्री. रवींद्र गोलांडे यांचा समावेश आहे.
प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री. आशाद शेख, श्री. राजेश यावलकर, श्री. द्वारकादास फटाले, श्री. बाजीराव अहिरे, श्री. दिलीपजी महाजन, श्री. संजय नेवे आणि श्री. संदीप महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येईल. याव्यतिरिक्त, संरक्षक मंडळात डॉ. नामदेवराव राऊत, श्री. प्रकाश सिठ, श्री. पी. आर. बडगुजर मार्गदर्शन करतील, तर उपाध्यक्ष पदी श्री. विलास पाटील, श्री. मकसूद सलमानी आणि श्री. श्याम सरंगिरे यांच्यासह अनेक वरिष्ठ सदस्य कार्यरत राहतील. कायदेशीर सल्ल्यासाठी ॲड. चंद्रकांतजी बिडकर आणि ॲड. सुभाषजी गोजे यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी श्री. आर. डी. चौधरी (९८६९४२५३०१), श्री. जी. एम. पाटील (९८६९२५४६००) किंवा श्री. श्रावण फरकाडे (९८२२४७०४५०) यांच्याशी संपर्क साधता येईल.

पत्रकार आशाद शेख, बोईसर
प्रसिद्धी प्रमुख 
महाराष्ट्र ओबीसी कृती समिती
Mob 9890232401

डायट’ने विद्यार्थ्यांची प्रगती, गुणवत्ता सुधारण्यासाठी दुवा म्हणून काम

 मंत्री दादाजी भुसे म्हणाले कीडायटने विद्यार्थ्यांची प्रगतीगुणवत्ता सुधारण्यासाठी दुवा म्हणून काम करावे. सामुहिक जबाबदारीने संवादसमन्वय साधून अपेक्षित काम पूर्ण करावे. राज्यातील शिक्षक आपल्या स्तरावर विविध उपक्रम राबवत असतातते समाजासमोर यावेत. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण होण्यासाठी राज्यजिल्हातालुकास्तरावर कवितानिबंध स्पर्धांचे आयोजन करावे. कविता शिकविताना वेगळी चाल लावून दिल्यास विद्यार्थीनी त्वरित आत्मसात करतात. राज्यातील इतर माध्यमांच्या शाळांसाठी मराठीचा योग्यसुलभ अभ्यासक्रम निवडा. दुसरीच्या पाठ्यपुस्तकात यंदा बदल करण्यात येणार असून पुस्तके बिनचूक प्रकाशित होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi