संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारकाबाबत पुनर्वसन बैठक
मुंबई, दि. १३: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित यंत्रणांनी कायमस्वरूपी तोडगा काढावा. पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जवळील जागांची पडताळणी करून पुनर्वसनासंदर्भात नियोजन करावे. निश्चित कालावधीत उद्यानाची हद्द निश्चित करून हद्दीवरील नागरिकांचे प्राधान्याने पुनर्वसन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात आयोजित बैठकीत दिले.
उद्यानातील अतिक्रमणधारकांना पुनर्वसन होईपर्यंत मानवीय दृष्टिकोनातून मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुलुंड आणि ठाणे बाजूकडील अतिक्रमणधारकांनाही पुनर्वसनासाठी त्या बाजूकडील जागांचा शोध घेऊन नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
No comments:
Post a Comment