Saturday, 14 March 2026

त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा

 त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

•       नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शिखर समिती बैठक

 

मुंबईदि १३: त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताची पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब  सोबत नेणार आहे. त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

त्र्यंबक-नाशिक सिंहस्थ कुंभमेळाकरिता करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात आयोजित कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ५ हजार १४० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ हजार ४१ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. कुंभमेळा निमित्त सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कुणी वाईट हेतूने किंवा मुद्दाम विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेलतर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतीलअसा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi