Wednesday, 11 March 2026

कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची सोयी सुविधा

 कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापायाभूत सुविधानिवास व्यवस्था आणि सुरक्षितता यांचा विचार करून सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी करावी. कामे वेळेत पूर्ण होणे जितके आवश्यक आहेतितकेच ती दर्जेदार आणि टिकाऊ असणेही महत्त्वाचे आहे.

 

कुंभमेळ्याच्या भव्यदिव्य आयोजनासाठी सर्व विभागानी आपआपसात समन्वय ठेवूनसिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरेलअशा पद्धतीने कामे पूर्ण करावीतअसे निर्देश मंत्री श्री महाजन यांनी यावेळी दिले.

सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या आध्यात्मिक

 जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले कीसिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे भव्य प्रतीक आहे. देशभरातून तसेच जगभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना उत्तम सुविधा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. यावेळी नाशिक चक्राकार रस्तात्र्यंबक डीपी रोडत्र्यंबक दर्शन पथद्वारका सर्कल परिसराचा विकासओझर विमानतळाशी संबंधित सुविधाघोटीवाले रोडकर्मचारी वसाहतघाट बांधकाम तसेच विविध प्रकल्पांसाठी भूसंपादनजमीन मोजणी आदी कामांचा सविस्तर आढावा मंत्री महाजन यांनी घेतला.

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा

 कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा

-         जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

·         नाशिकत्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची आढावा बैठक

 

मुंबईदि. १० : नाशिकत्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा (विदर्भतापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने सर्व सुविधा नियोजनबद्धदर्जेदार आणि वेळेत पूर्ण कराव्यातअसे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.


मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर उभारण्यात येणाऱ्या या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा........

 मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर उभारण्यात येणाऱ्या या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणेभिवंडीकल्याण-डोंबिवलीअंबरनाथबदलापूर तसेच परिसरातील अनेक शहरांना भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करता येणार आहे. ठाणे जिल्हा आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा प्रकल्प दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता प्रकल्पाला गती देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.

००००

*भारत कधी हारतो?* Pl share

 *भारत कधी हारतो?*


भारताने क्रिकेट सामना जिंकल्यानंतर भरपूर फटाके वाजवून आपण आनंद व्यक्त करतो. परंतु नेहमीच्या आपल्या रोजच्या जीवनात आपण भारताला अनेक वेळा स्वतःहून हरवत असतो. चला जाणून घेऊया आपण भारताला कुठे कुठे आणि कधी कधी हरवतो.


ज्यावेळी कचरा हा कचरा कुंडीत न टाकता कुठेही रस्त्यावर टाकतो तेव्हा भारत हारतो.


जेव्हा आपण बाहेर सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे मध्ये, बस मध्ये, गाडी चालवत असताना पचापच पिचकाऱ्या मारतो तेव्हा भारत हारतो.


येथे थुंकू नये असा फलक लावलेला असतो तेथेच थुंकतो तेव्हा भारत हारतो.


कोर्ट, कचेरी, सार्वजनिक इमारती मधील सगळे जीने, कोपरे, स्वच्छता गृहे लाल बुंद करतो तेव्हा भारत हारतो.


थुंकू नये म्हणून देवाचे फोटो लावावे लागतात आणि तरीही थुंकतो तेव्हा भारत हारतो.


काढलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरता कर्ज कसे बुडीत जाईल असा विचार करतो तेव्हा भारत हारतो.


ग्राहकांकडून वाजवी नफा घेऊन माल न विकता अवास्तव नफा घेतो तेव्हा भारत हारतो.


खरेदीसाठी बाहेर पडताना थैली न घेता जातो आणि भरपूर प्लास्टिक पिशव्या घेऊन घरी येतो तेव्हा भारत हारतो.


गर्दीच्या ठिकाणी रांगेत न जाता मध्येच घुसतो तेव्हा भारत हारतो. 


आंदोलन, मोर्चे काढताना सरकारी, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो तेव्हा भारत हारतो.


लोकांशी कठोरपणे अव्यवहाने वागतो तेव्हा भारत हारतो.


शेजारीपाजारी किरकोळ कारणावरून वाद घालतो तेव्हा भारत हारतो.


गरीब भाजीवाल्याकडे हुज्जत घालतो आणि हाॅटेलमध्ये गेल्यावर चार पाच हजारांचे झटक्यात ऑनलाईन पेमेंट करतो तेव्हा भारत हारतो. 


बसमध्ये, रेल्वेमध्ये प्रवास करताना कचरा आणि अस्वच्छता करतो तेव्हा भारत हारतो.


पर्यटनासाठी बाहेर निसर्गात गेल्यावर तेथे कचरा, बाटल्या फेकतो तेव्हा भारत हारतो.


वाहने चालवताना फोनवर बोलत गाडी चालवतो तेव्हा भारत हारतो.


वाहतुकीचे नियम न पाळता अत्यंत बेदरकारपणे वाहने चालवतो व आपल्या बरोबर दुसऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करतो तेव्हा भारत हारतो.


कायदे, नियम हे दुसऱ्यांनी पाळण्यासाठी आहेत असा विचार करतो व स्वतः बेदरकारपणे वागतो तेव्हा भारत हारतो.


गाडी पार्क करताना मोकळी जागा आहे म्हणून कशीही पार्क करतो तेव्हा भारत हारतो.


प्रत्यक्ष आणि फोनवर बोलताना शिष्टाचाराचे पालन करत नाही तेव्हा भारत हारतो.


आपला धर्म संस्कृती टिकावी वाढावी यासाठी काहीही करत नाही व फक्त मौजमजा करण्यासाठी जगतो तेव्हा भारत हारतो.


घरातील सदस्यांना नातेवाईकांना चांगली, सन्मानाने वागणूक देत नाही तेव्हा भारत हारतो.


दुसऱ्याचं वाईट चिंतन करतो, द्वेष मत्सर करतो तेव्हा भारत हारतो.


गैरमार्गाने भ्रष्टाचार करून घरात पैसा आणतो तेव्हा भारत हारतो.


समाजात वावरताना महिलांकडे वाईट नजरेने पाहतो तेव्हा भारत हारतो.


स्वदेशीचा आग्रह न धरता विदेशी वस्तू व वाहने खरेदी करतो तेव्हा भारत हारतो.


पाण्याचे हवेचे कसलाही विचार न करता प्रदूषण करतो तेव्हा भारत हारतो.


पाणी, वीज, पेट्रोल डिझेल यांचा अंधाधुंद वापर करतो तेव्हा भारत हारतो.


आपल्याला मिळणारा पगार, मानधन, मजुरी याचा योग्य परतावा न देता कामचुकारपणा करतो तेव्हा भारत हारतो.


आपल्याकडे असलेले पद, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा वापर लोकांच्या मदतीसाठी न करता त्रास देण्यासाठी करतो तेव्हा भारत हारतो.


आपापसातील किरकोळ गोष्टी व वाद विवादावर समझोता न करता पोलीस स्टेशन आणि कोर्ट गाठतो तेव्हा भारत हारतो.


मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न न करता व विचारांना गौण समजून फक्त पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी शिक्षण देतो तेव्हा भारत हारतो.


जगातून, समाजातुन फक्त घेतो आणि घेतो परंतु आणि सामाजिक जबाबदारी म्हणून काहीच परत देत नाही तेव्हा भारत हारतो.


कामाच्या वेळी मागे आणि श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करतो तेव्हा भारत हारतो.


देवाधर्मावर अनाठायी टिका करतो, आपल्या अर्धवट विचारांचे ओंगळवाणे प्रदर्शन करून जातीवाद करतो तेव्हा भारत हारतो.


वेळेवर नगरपालिका कर, घरपट्टी, शेतसारा, आयकर आपण भरत नाही तेव्हा भारत हारतो.


आपली परीस्थिती चांगली असताना आपण सरकारी योजनांचा फायदा घेत असतो तेव्हा भारत हारतो.


आपल्या कुटुंबाच्या, गावाच्या नावाला डाग लागेल असे जेव्हा काम करतो तेव्हा भारत हारतो.


आपण जाणीवपूर्वक शक्य असताना मतदान करत नाही तेव्हा भारत हारतो.


आपण देश हित लक्षात न घेता पैसे घेऊन मतदान करतो तेव्हा भारत हारतो.


छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा आदर्श न घेता त्यांच्या विचारांची अवहेलना करतो तेव्हा भारत हारतो. 


यातील ज्या गोष्टी करायला नकोत तरी आपण करत असलो आणि ज्या गोष्टी करायला हव्यात परंतु करत नसलो तर भारत जिंकला म्हणून फटाके वाजवण्याला काय अर्थ राहिला? तो ही एक पोरकटपणा, उथळपणा करुन परत भारत हरवला.


यामध्ये भारताची हार तर आहेच तत्पुर्वी अयोग्य, असंस्कारी, अविचारी असा ठप्पा आपण स्वतः आपल्यावर मारून घेतो. यामध्ये प्रथम आपण स्वतः मारतो आणि काही कारण नसताना देशाची मान खाली घालायला लावतो.


अजून अशा बऱ्याच गोष्टी असतील आपल्या वागणुकीने आपण भारताला रोज पराजित करत असतो. त्या गोष्टी आपले वैयक्तिक अनुभव आहेत त्यांचे आत्मपरीक्षण करा आणि भारताचे प्रामाणिक नागरिक म्हणून भारताला हरवणे बंद करा. कारण ते आपल्याच हातात 🫵 आहे.


◆◆◆

कळू धरण प्रकल्पग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई देणे तसेच पात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या संधी उपलब्ध

 प्रकल्पग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई देणे तसेच पात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत प्राधान्याने विचार करण्यात येईलअसेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जमीन मोजणीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

काळू धरण प्रकल्पाला गती देण्याचे मंत्री गिरीश महाजन निर्देश · प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढणार

 काळू धरण प्रकल्पाला गती देण्याचे मंत्री गिरीश महाजन निर्देश

·        प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढणार

 

मुंबईदि. १० : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी काळू धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त गावांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. काळू धरण हा ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून भविष्यातील वाढत्या पाणीटंचाईवर तो कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करून कामाला वेग देण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.

या बैठकीस आमदार किसन कथोरेआमदार रवींद्र चव्हाणअपर मुख्य सचिव (प्रकल्प व विकास) दीपक कपूरतसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे ऑनलाईन उपस्थित होते. या बैठकीत काळू धरण प्रकल्पासाठी झालेल्या ग्रामसभांचा आढावा घेण्यात आला. ११ गावांमध्ये प्रकल्पास विरोध नोंदविण्यात आला होतातर ७ गावांमध्ये ग्रामसभाच झाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर प्राधान्याने ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

Featured post

Lakshvedhi