Saturday, 7 March 2026

फिनलंड अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुंबई विद्यापीठास भेट

 फिनलंड अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुंबई विद्यापीठास भेट

 

मुंबईदि.6 : फिनलंड देशाचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी आज मुंबई विद्यापीठ येथे भेट दिली. या भेटी दरम्यान फिनलंड येथील शिक्षण पद्धतीभारतीय आणि फिनलंड मधील शैक्षणिक संधीबदलते आंतरराष्ट्रीय राजकारणतंत्रज्ञान, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आदि विषयांवर निमंत्रित मान्यवर, अध्यापक आणि विद्यार्थी यांच्याशी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांवर उत्तरे देत चर्चा केली.

            यावेळी फिनलंड कॉन्सिलेट जनरल एरिफ अफ हॅलोस्ट्रॉम, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णीमुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक द हिंदूच्या विनया देशपांडे यांनी केले.

0000

भागीदारी केवळ पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रतिनिधित्व करत नाही

 मंत्री नितेश राणे म्हणालेया तीनही कंपन्या ससून मासेमारी बंदराला सुरक्षितस्वच्छ आणि आधुनिक करण्यास काम करतील.  प्लास्टिक कचरा पुनर्वापरटाकून दिलेल्या मासेमारी जाळ्यांचे पुनर्वापर आणि क्षमता बांधणीद्वारे नेट दुरुस्ती प्रणाली मजबूत करण्यास मदत होईल. ही भागीदारी केवळ पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रतिनिधित्व करत नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार जागतिक मानकांनुसार ससून डॉकला आदर्श मासेमारी बंदर बनवण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे.

 मच्छीमारांच्या कल्याणासाठीमत्स्यव्यवसायाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि शाश्वत किनारी विकासासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. ससून डॉक मच्छीमार समुदायासाठी प्रगतीनावीन्य आणि समृद्धीचे प्रतीक बनविण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहनही मंत्री श्री. राणे यांनी केले.

000

डॉक, आज आपल्या मासेमारी समुदायासाठी एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून

 मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले,  मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीखालील जुना ससून डॉक,  महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या अंतर्गत नवीन डॉकआज आपल्या मासेमारी समुदायासाठी एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून उभे आहे. सुमारे 1,560 नोंदणीकृत मोटार चालवलेल्या मासेमारी नौका आणि सरासरी वार्षिक 50 ते 60 हजार मेट्रिक टन मासेमारी उत्पादनासहससून डॉक महाराष्ट्र तसेच भारताच्या मासेमारी अर्थव्यवस्थेत  महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या काही वर्षांत येथे नेट मेंडिंग शेडवर्कशॉपभूमिगत पाण्याची टाकीपाणीपुरवठा पाईपलाईनपंप हाऊससंरक्षण भिंतसार्वजनिक शौचालये आणि सुरक्षा रक्षक घराचे नूतनीकरणकचराकुंड्यांची व्यवस्था करणेजुन्या संरचना पाडणेइलेक्ट्रिकल सबस्टेशनसाठी बांधकाम आदी कामे करण्यात आली आहे. सध्या बर्फ संयंत्रघाटाच्या भिंतीचे मजबुतीकरणमच्छिमारांसाठी विश्रांती कक्षांचे बांधकाम आणि आधुनिक लिलाव हॉलची कामे प्रगतीपथावर आहेत.

ससून गोदीला आधुनिककार्यक्षमस्वच्छ आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत मासेमारी बंदरात रूपांतरित करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या आधुनिकीकरण उपक्रमाचे उद्दिष्ट तंत्रज्ञानाचा विस्तार करणेडिजिटायझेशनला प्रोत्साहन देणेसुधारणा करणे असल्याचेही मत्स्य व्यवसाय मंत्री श्री राणे म्हणाले. 

फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविणार

 फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार


ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविणार

-मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 7: मुंबईस्थित ससून मासेमारी बंदर हे मोठ्या मासेमारी बंदरांपैकी एक आहे. ससून मासेमारी बंदराचा विकास हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. ससून मासेमारी बंदराला जगातील

 सर्वोत्तम बनविण्यासाठी फिनलंड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहेअसे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

हॉटेल ताज पॅलेस येथे फिनलंड देशातील  हेल्वरमिरासिस आणि रिव्हर रीसायकल  कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामीमत्स्य व्यवसाय आयुक्त विजय सूर्यवंशीमहाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपालेफिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉमसहाय्यक सजू नायर,  फिनलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा आदी उपस्थित होते. 

एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्क विषयी

 एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्क विषयी

           महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्यादृष्टीने महत्वाचा असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. ब्लॅकस्टोन समर्थित हे पार्क ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून साकारले जात आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे राज्यातील पहिलेच 'इंटेलिजन्स-इंटिग्रेटेडऔद्योगिक संकुल आहे.

          या प्रकल्पामुळे नागपूर आणि परिसरात सुमारे २,५०० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. हे औद्योगिक संकुल केवळ कारखाना नसून 'स्मार्ट कॅम्पसअसेल. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित इमारत व्यवस्थापन यंत्रणा आणि 'डिजिटल ट्विनतंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहेज्यामुळे ऊर्जेची बचत आणि कामाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.

          एक्सएसआयओ मार्फत महाराष्ट्रात एकूण ८,१४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून त्याद्वारे राज्यात ३५,००० हून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन २५०० लोकांना मिळणार रोजगार

 उद्योगाचे मॅग्नेट म्हणून नागपूरच्या विकासात  

एक्सएसआयओने महत्वाची भूमिका वठवावी

-     

 

महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत

प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन

 

२५०० लोकांना मिळणार रोजगार प्रकल्पामुळे राज्यातील उद्योगाला मिळणार नवी दिशा

 

नागपूरदि.७: राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्वाची भूमिका वठवावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

          नागपूर-अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेवित्त व नियोजन राज्यमंत्री  ॲड. आशिष जयस्वालआमदार सर्वश्री  डॉ. आशिष देशमुख, चरणसिंह ठाकूरजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरएक्सएसआयओ इंडस्ट्रीयल ॲण्ड लॉजिस्टिक पार्कचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आदी उपस्थित होते

कवी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या विविधांगी प्रतिभेचा समग्र धांडोळा घेणारा “हर एक पल का शायर साहिर” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 कवी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या विविधांगी प्रतिभेचा समग्र धांडोळा घेणारा हर एक पल का शायर साहिर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

 

मुंबईदि. 7 कवी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या विविधांगी प्रतिभेचा समग्र धांडोळा घेणारा हर एक पल का शायर साहिर या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम शनिवार 7 मार्च, 2026 रोजी रात्री 8.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिरबोरीवली येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात गायक म्हणून श्रीकांत नारायणसरिता राजेशसौम्या वर्मा आणि मुख्यार शाह यांचा सहभाग आहे. संगीत संयोजन प्रवीण फाटक यांनी केलेले असून या कार्यक्रमाचे निवेदन आरती शेट्टी व ध्वनीव्यवस्था नितीश फणसे करीत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक लोकप्रिय गीतांचा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi