Thursday, 5 March 2026

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत टोयोटा इंडियातर्फे एक्सलन्स सेंटर

 छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत टोयोटा इंडियातर्फे एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले आहे. त्या सेंटरचे मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दृकश्राव्य पद्धतीने एकाचवेळी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील आयटीआयमधील 17 संस्थांमध्ये 17 अद्ययावत प्रयोगशाळांचे उद्घाटन झाले आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये इतर मागासबहुजन कल्याण मंत्री अतुल सावेव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशीविशेष कार्य अधिकारी पंकज पाठकटोयाटोचे रमेश रावरवी सोनटक्केरूपा बोहरा यांच्यासह विद्यार्थीनागरिक उपस्थित होते.

टोयाटो कंपनीने सीएसआर निधीतून छत्रपती संभाजीनगर विभागातल्या चौदा तर नागपूर येथील तीन आयटीआय संस्थानामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारल्या आहेत. 17 प्रयोगशाळांसाठी पाच कोटी 44 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीचा नवा अध्याय युवकांसाठी अद्ययावत प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती -

 सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीचा नवा अध्याय

युवकांसाठी अद्ययावत प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

आयटीआय आणि टोयोटाच्या उभारलेल्या प्रयोगशाळांचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरसह नागपूर विभागातील अद्ययावत प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण,

उद्योगांना पूरक प्रशिक्षण

 

मुंबईदि.5 : सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीतून राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण आणि आदर्शवत संस्थांमध्ये रूपांतर करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात येत आहेत. आघाडीची कंपनी टोयोटा आणि आयटीआयच्या (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण प्रकल्प राबवला जात असून ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक प्रशिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्याचे कौशल्य विकासरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत टोयोटा इंडियातर्फे एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले आहे. त्या सेंटरचे मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दृकश्राव्य पद्धतीने एकाचवेळी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील आयटीआयमधील 17 संस्थांमध्ये 17 अद्ययावत प्रयोगशाळांचे उद्घाटन झाले आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये इतर मागासबहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

2 वर्षात 200 एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार – आमदार विलास तरे

 2 वर्षात 200 एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार – आमदार विलास तरे


# परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत निर्णय


मुंबई. ( प्रतिनिधी ) – पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पालघर जिल्ह्यासाठी पुढील 2 वर्षांत एकूण 200 नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली.

दरम्यान आमदार विलास तरे यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातील विविध एस.टी. आगारांमध्ये मनुष्यबळ व बसेस मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन या विषयावर तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने दि. 05 मार्च 2026 रोजी विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने 200 नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात 90 बसेस आणि सन 2027 - 28 या आर्थिक वर्षात 110 बसेस देण्यात येणार आहेत. तसेच या बसेस जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये आवश्यकतेनुसार वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये पालघर आगारासाठी 10, सफाळे 10, वसई 15, अर्नाळा 15, डहाणू 05, जव्हार 15, बोईसर 10 आणि नालासोपारा 10 बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय विभागीय कार्यशाळा व संबंधित आगारांमधील रिक्त पदे येत्या 03 महिन्यांच्या आत पूर्ण क्षमतेने भरण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

यावेळी आमदार विलास तरे यांनी दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या “परीक्षेसाठी पिकअप वाहनातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास” या बातम्यांकडे मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मानव विकास मिशन अंतर्गत ‘गाव ते शाळा’ ही मोफत बस सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘गाव ते शाळा’ मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या निर्णयांमुळे पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ व नियमित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा विश्वास आमदार विलास तरे यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार लागेल, असेही आ. तरे यांनी नमूद केले.

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

 महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

·         राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथकबड्डी स्पर्धा नागपूरकुस्ती स्पर्धा बीड तर खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन

·        उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

 

मुंबईदि. ४ : यंदाची छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथेछत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथेस्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड येथे तसेच कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा बारामती येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

२०२५-२६ या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील उदंचन जलविद्युत प्रकल्प

 महाराष्ट्रातील उदंचन जलविद्युत प्रकल्प

राज्यात आतापर्यंत एकूण ५५ उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे ७८,२१५ मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे. या माध्यमातून सुमारे ४.१७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तर १.२८ लाख मनुष्यबळासाठी रोजगारनिर्मिती होणार आहे.

 

या योजनांनुसार औद्योगिक दराने सुमारे १,७६२.२१ कोटी रुपयांचा महसूल तर प्रतिवर्ष पुनर्भरणातून सुमारे १२८.३२ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणे अपेक्षित आहे.

 

ऊर्जा क्षेत्रातील ही मोठी गुंतवणूक राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी ठरेलअसा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी

 पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

 

मुंबईदि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी चॅम्बेरी पॉवर (ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांची समूह कंपनी) यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

 

विधान भवन येथे यावेळी आयोजित या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटीलजलसंपदा  (विदर्भतापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको)चे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी.ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरिएक सर्वन तसेच विविध विभागांचे वरिष्ठ

उदचंन जलविद्युत प्रकल्पांचे सामंजस्य करार

 जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले कीउदचंन जलविद्युत प्रकल्पांचे सामंजस्य  करार 12 ऑगस्ट3 सप्टेंबर26 सप्टेंबर 2024 तसेच 29 एप्रिल1 व 15 जुलै3 नोव्हेंबर आणि 10 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले. प्रमुख कंपन्यांमध्ये अदानी ग्रीन एनर्जी लि. (9,900 मेगावॅट, ₹54,450 कोटी30,000 रोजगार)एनएचपीसी लि. (7,350 मेगावॅट, ₹44,100 कोटी7,350 रोजगार)जेएसडब्लू एनर्जी (8,200 मेगावॅट, ₹36,514 कोटी15,200 रोजगार)टीएचडीसीआयएल  (6,790 मेगावॅट, ₹33,622 कोटी6,300 रोजगार) आणि टोरंट पॉवर लि. (5,600 मेगावॅट, ₹28,000 कोटी13,500 रोजगार) यांचा समावेश आहे.

याशिवाय टाटा पॉवर कंपनी लि.एनटीपीसी लि.जेएसडब्ल्यू निओ एनर्जी लि.मेघा इंजि. अँड इन्फ्रा लि.वेलस्पन न्यू एनर्जी लि.रिन्यू हायड्रो पॉवर प्रा. लि.महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लि. आणि अवाडा ॲक्वा बॅटरीज प्रा.लि या कंपन्यांनीही सामंजस्य करार केलेले आहेत.

Featured post

Lakshvedhi