छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत टोयोटा इंडियातर्फे एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले आहे. त्या सेंटरचे मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दृकश्राव्य पद्धतीने एकाचवेळी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील आयटीआयमधील 17 संस्थांमध्ये 17 अद्ययावत प्रयोगशाळांचे उद्घाटन झाले आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी पंकज पाठक, टोयाटोचे रमेश राव, रवी सोनटक्के, रूपा बोहरा यांच्यासह विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
टोयाटो कंपनीने सीएसआर निधीतून छत्रपती संभाजीनगर विभागातल्या चौदा तर नागपूर येथील तीन आयटीआय संस्थानामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारल्या आहेत. 17 प्रयोगशाळांसाठी पाच कोटी 44 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment