राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली की, दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि वालभट नद्या यांचे पुनरुज्जीवन कार्य सुरू आहे. दहिसर नदीसाठी दोन मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम पूर्ण झाले असून प्रकल्प ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. पोयसर नदीसाठी १० मलजल प्रक्रिया केंद्रांपैकी नऊ केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. ओशिवरा आणि वालभट नदीसाठी पाच प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून तीही प्रगतीपथावर आहेत.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 4 March 2026
मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत
विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी, मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत कोणती कारवाई केली, याची माहिती सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, मंडळाने त्वरित जबाबदारी घ्यावी आणि एका आठवड्यात अहवाल सादर करावा.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली की, दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि वालभट नद्या यांचे पुनरुज्जीवन कार्य सुरू आहे. दहिसर नदीसाठी दोन मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम पूर्ण झाले असून प्रकल्प ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. पोयसर नदीसाठी १० मलजल प्रक्रिया केंद्रांपैकी नऊ केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. ओशिवरा आणि वालभट नदीसाठी पाच प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून तीही प्रगतीपथावर आहेत.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, नदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तथापि, अनेक गोठ्यांची नोंदणी अद्याप न झाल्याने कारवाईत विलंब होत आहे. दहिसर नदी प्रकल्पात १३०, पोयसरमध्ये २,५५४ आणि ओशिवरा नदी प्रकल्पात ७०० घरे व दुकाने बाधित असून, पात्र बांधकामांच्या पर्यायी सदनिकांअभावी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.
या चर्चेत विधानसभा सदस्य मनिषा चौधरी, योगेश सागर, दिलीप लांडे, अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.
00000
दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार
दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे
काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार
-राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. २६ : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. दहिसर (मुंबई) नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नास उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, दहिसर नदी परिसरातील गोठ्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभागाने संबंधित नकाशा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. गोठे हलविण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले असून, नोटिस देऊन स्थलांतराची कारवाई सुरू आहे.
ब्लिंकइट'द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई
'ब्लिंकइट'द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई
-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. २६ : पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने चौकशी केली असता प्रारंभी कोणताही ठोस पुरावा सापडला नव्हता. मात्र लेखापरीक्षण अहवाल आणि संबंधित कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर काही दिवसांपूर्वी 'ब्लिंकइट'च्या माध्यमातून कालबाह्य अन्न वितरित झाल्याचे स्पष्ट झाले. कंपनीवर कायदेशीर कारवाईही सुरू असून दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत आमदार भिमराव तापकीर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री झिरवाळ बोलत होते.
अन्न व औषध प्रशासन विभागात १९१ अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व आस्थापनांना सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी चर्चेत विधानसभा सदस्य अमित देशमुख, अजय चौधरी आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी सहभाग घेतला.
औरंगपुरा व मकबरा रोडवरील दोन ठिकाणी महानगरपालिकेने
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, औरंगपुरा व मकबरा रोडवरील दोन ठिकाणी महानगरपालिकेने शौचालये उभारली आहेत. त्यापैकी औरंगपुरा येथील महिलांसाठीचे शौचालय जय काल भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्याकडे तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात आले असून ते कार्यरत आहे. तर मकबरा रोडवरील शौचालय सध्या महानगरपालिकेमार्फतच वॉर्ड अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालविण्यात येत आहे.
राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी व अस्वच्छतेच्या समस्यांबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, शौचालये लवकरात लवकर उभारून नागरिकांना स्वच्छतेच्या मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छतागृहे उपलब्ध उपलब्ध करून देणार
छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छतागृहे उपलब्ध उपलब्ध करून देणार
-राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. २६ – छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिकेकडून पे-अँण्ड-यूज पद्धतीवर २४ शौचालये चालविली जात असून, झोन क्रमांक १ ते १० अंतर्गत आणखी ४६ शौचालये बांधण्यात आली आहेत. तसेच, महानगरपालिकेच्या ३३ शाळांमध्ये महिलांसाठी व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष रॅम्पसह शौचालये कार्यरत आहेत. याशिवाय, स्वच्छ भारत अभियान २.० आणि स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत एकूण २१ नवीन स्वच्छतागृहांची बांधकामे सुरू असून ती लवकरच नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध होतील, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले..
छत्रपती संभाजीनगर शहरात पुरेशी सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्याबाबत आमदार नारायण कुचे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन
-विधानसभा तालिका अध्यक्ष योगेश सागर
मुंबई, दि. २६ : दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यात ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो. त्याच औचित्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ‘जावे विनोदाच्या गावा’ हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते ११.४५ या वेळेत विधानभवनात होणार आहे, अशी माहिती विधानसभेचे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी सभागृहाला दिली.
या कार्यक्रमास पीठासीन अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, मराठी भाषा मंत्री, मराठी भाषा समितीचे प्रमुख, मंत्री व राज्यमंत्री, दोन्ही सभागृहांचे सदस्य तसेच पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित ‘लोक सेवेचा लोकजागर’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...