Thursday, 5 March 2026

जालना जिल्ह्यातील मंठा येथे एमआयडीसी उभारणीसंदर्भात लवकरच बैठक

 जालना जिल्ह्यातील मंठा येथे एमआयडीसी उभारणीसंदर्भात लवकरच बैठक

– उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक

मुंबईदि. २६ : जालना जिल्ह्यातील मंठा येथे एमआयडीसी उभारणीबाबत शासन सकारात्मक असून लवकरच राज्यभरातील औद्योगिक वसाहतीसंदर्भात बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल,  अशी माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक विधान परिषदेत  दिली.

 

जालना जिल्ह्यातील मंठा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची औद्योगिक वसाहत सुरू करण्याबाबत विधान परिषद सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्न उपस्थित केला असता उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. सतेज उर्फ बंटी पाटीलअभिजीत वंजारीप्रवीण दरेकर आणि शशिकांत शिंदे यांनीही उपप्रश्न विचारले.

, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांप्रमाणेच वेतन व अनुदानाचे नियम समाज कार्य महाविद्यालयांनाही लागू

 समाज कार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सध्याचे निवृत्ती वय 60 वर्षे असून ते 62 वर्षांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली. कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांप्रमाणेच वेतन व अनुदानाचे नियम समाज कार्य महाविद्यालयांनाही लागू राहतीलअसे त्यांनी सांगितले.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू

 लक्षवेधीला उत्तर देतांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले कीशासन निर्णयानुसार समाज कार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना कॅश योजना लागू करण्यात आली आहे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू झाली आहे. 10-20-30 या आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी सुरू असून अर्जित रजा रोखीकरणाचा विषयही लवकरच मार्गी लावला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समाज कार्य महाविद्यालयांतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी

 समाज कार्य महाविद्यालयांतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबईदि. 26 : राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत असून अनेक निर्णय प्रक्रियेत आहेतअशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

 

विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालय समाज कल्याण विभागाकडून 2024 मध्ये उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला. यावरसमाज कार्य महाविद्यालये दीर्घकाळ समाज कल्याण विभागाकडे होती. त्यानंतर संबंधित विषयावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जात असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी सभागृहाला दिली.

पालघरमधील अंगणवाड्या हस्तांतरण प्रकरणे प्रलंबित

 पालघरमधील अंगणवाड्या हस्तांतरण प्रकरणे प्रलंबित असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना ती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले जातील. नवीन अंगणवाड्यांसाठी जिल्हा नियोजनच्या 3% राखीव निधीतून प्राधान्याने तरतूद केली जाईल. टीएचआर (टेक होम रेशनसंदर्भातील सूचनांनुसार केंद्र शासनाकडे बदलांसाठी विनंती करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींच्या अभिप्रायानुसार सुधारित निकषांनुसार आहार पुरवला जाईल. नवीन शिक्षण धोरणानुसार शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत 24,700 हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किट

 महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्याराज्यात आतापर्यंत 24,700 हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्यात आले असून राज्यात एकूण 1.10 लाखांपेक्षा जास्त अंगणवाड्या आहेत. दरवर्षी 5,000 अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले असून त्यासाठी सुमारे 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. स्मार्ट किट देताना संबंधित अंगणवाडीची इमारत ही शासनाच्या स्वमालकीची असणे बंधनकारक आहे.

 

स्मार्ट किटसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते. मात्र प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश दरवर्षी दिले जातात. शासनाच्या आर्थिक नियमांनुसार ही प्रक्रिया पार पाडली जातेअसे त्यांनी सांगितले.

स्मार्ट अंगणवाडी’ योजनेत महाराष्ट्र देशात अग्रणी राज्यात 24,700 हून अधिक स्मार्ट किटचे वितरण

 स्मार्ट अंगणवाडी’ योजनेत महाराष्ट्र देशात अग्रणी

राज्यात 24,700 हून अधिक स्मार्ट किटचे वितरण

-महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि.२६ : स्मार्ट अंगणवाडी’ ही अभिनव योजना राज्यात राबविण्यात येत असून  या योजनेमध्ये महाराष्ट्र देशात अग्रणी ठरला आहे. आतापर्यंत राज्यातील 24,700 हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किटचे वितरण करण्यात आले आहेअशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 

याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकरसदाभाऊ खोतचित्रा वाघप्रसाद लाडराजेश राठोडअमोल मिटकरीज. मो. अभ्यंकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

Featured post

Lakshvedhi