समाज कार्य महाविद्यालयांतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी
- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबई, दि. 26 : राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत असून अनेक निर्णय प्रक्रियेत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालय समाज कल्याण विभागाकडून 2024 मध्ये उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला. यावर, समाज कार्य महाविद्यालये दीर्घकाळ समाज कल्याण विभागाकडे होती. त्यानंतर संबंधित विषयावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जात असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी सभागृहाला दिली.
No comments:
Post a Comment