जालना जिल्ह्यातील मंठा येथे एमआयडीसी उभारणीसंदर्भात लवकरच बैठक
– उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक
मुंबई, दि. २६ : जालना जिल्ह्यातील मंठा येथे एमआयडीसी उभारणीबाबत शासन सकारात्मक असून लवकरच राज्यभरातील औद्योगिक वसाहतीसंदर्भात बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक विधान परिषदेत दिली.
जालना जिल्ह्यातील मंठा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची औद्योगिक वसाहत सुरू करण्याबाबत विधान परिषद सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्न उपस्थित केला असता उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. सतेज उर्फ बंटी पाटील, अभिजीत वंजारी, प्रवीण दरेकर आणि शशिकांत शिंदे यांनीही उपप्रश्न विचारले.
No comments:
Post a Comment