राज्यमंत्री नाईक म्हणाले की, मंठा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी सलग 25 हेक्टर आर पेक्षा जास्त जमिनीची आवश्यकता असते. शासकीय जमीन उपलब्धतेबाबत तहसीलदारांना पत्र लिहून विचारणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर, मंठा येथे औद्योगिक वसाहत उभारणीनंतर येथील भागातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, अशी माहिती राज्यमंत्री नाईक यांनी दिली.
एमआयडीसी स्थापन करण्याबाबत या अधिवेशनाच्या कालावधीतच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल आणि या बैठकीत राज्यभरातील एमआयडीसी संदर्भात आढावा घेण्यात येईल, असे राज्यमंत्री नाईक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment