Sunday, 1 March 2026

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी

 कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कॅनेडियन शिष्टमंडळसाठी स्वागत कार्यक्रम

 

मुंबईदि. १ : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे. महाराष्ट्रही हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगतीचा ठसा उमटवत आहे. कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. कॅनडा येथील शैक्षणिक संस्थाउद्योजक यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावीअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेनकॅनडातील न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट व शिष्टमंडळासाठी आयोजित स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थिती

 देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थिती

 

मुंबईदि. 28  :- भारताच्या नारी शक्तीला सबळ करण्यासाठी आणि माता व मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाबाबत सरकारची संवेदनशील भूमिका असून संवेदनशीलतेची संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे गौरवोद्गगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी काढले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथून देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. या समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीदवारे उपस्थित होते. यावेळी 'वर्षानिवासस्थानी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ अशिष जयस्वालअपर मुख्य सचिव अश्विनी भिडेसार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायकप्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.

माध्यम प्रतिनिधींना तातडीच्या प्रसंगी वैद्यकीय मदतीसाठी दोन सुसज्ज रुग्णवाहिका समर्पित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधान भवन प्रांगणात लोकार्पण

 माध्यम प्रतिनिधींना तातडीच्या प्रसंगी वैद्यकीय मदतीसाठी दोन सुसज्ज रुग्णवाहिका समर्पित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

 विधान भवन प्रांगणात लोकार्पण

 

             मुंबईदि. 28 :- समाज आणि देशाच्या व्यापक हितासाठी पत्रकार सातत्याने संवेदनशीलआव्हानात्मक आणि अनेकदा धोकादायक परिस्थितीत काम करत असतात. नैसर्गिक आपत्तीअपघातदंगली किंवा इतर संवेदनशील भागात वार्तांकन करताना कधी कधी तातडीच्या वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासू शकते. अशा प्रसंगी त्वरित आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी समर्पित रुग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

           मात्र कोणत्याही पत्रकार अथवा प्रतिनिधींवर ही रुग्णवाहिका वापरण्याची वेळ येऊ नयेअशी अपेक्षा अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

          विधान भवन प्रांगणात महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी दोन सुसज्ज ॲम्बुलन्सचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  झाले. या कार्यक्रमास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकरोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेआर बी जी फाऊंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे तसेच असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया रुग्णवाहिका केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर गरज पडल्यास इतर रुग्णांनाही उपयोगी पडतील. त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होईल. समाजासाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दैनंदिन घडामोडींचे वार्तांकन करणारे पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आर बी जी फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ यांच्या सहकार्याने या ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यावेळी असोसिएशनचे महासचिव पंकज दळवीकार्यकारिणी सदस्य मनश्री पाठकमनाली गायकवाडराजेश साफळेअनिल सौंदडे तसेच विधान भवनातील मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेस आणि आरोग्य संरक्षणास बळकटी मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवी मुंबईत आयोजन · भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप

 महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवी मुंबईत आयोजन

·         भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप

 

मुंबईदि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने "महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा"  या  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार ०१ मार्च२०२६ रोजी दु. १२:०० वाजताभूमिपुत्र भवनउलवेनवी मुंबई येथे होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक  कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेत स्त्री ही शक्तीत्याग आणि प्रेरणेचे प्रतीक मानली जाते. महिला लोककलांमध्ये विविध लोकगीत आणि नृत्याचे प्रकार आहेतज्यामध्ये पारंपरिक वेशभूषासंगीत आणि नृत्यशैलींचा समावेश असतो. महिलांच्या या कलाकौशल्ये आणि सामाजिक स्थानाला योग्य महत्त्व देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता नृत्यगीतनाटिका आणि विविध सादरीकरणांद्वारे स्त्रीशक्तीचा जागर मांडला जाईल. या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्याचा उद्देश आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असूननवी मुंबई परिसरातील कलाप्रेमींनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य  संचालक श्रीराम पांडे  यांनी केले आहे.

या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजनेंतर्गत धनादेश वाटप करण्यात येणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री करिता आर्थिक सहाय्य

 दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री करिता आर्थिक सहाय्य

 

मुंबईदि. २८ : दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असूनस्वयंरोजगार सुरू करण्याकरिता आवश्यक साधन सामग्री (टूलकिट) खरेदीसाठी कमाल १५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे. पूर्वी या योजनेद्वारे एक हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत होते. हे अर्थसहाय्य पुरेसे नसल्याने व प्रशिक्षित दिव्यांग लाभार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता या योजनेच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आली आहे, याबाबतचा दिव्यांग कल्याण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.

           

 या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास तसेच स्वतःचा व्यवसाय उभारण्यास मोठी मदत होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अनेक दिव्यांग व्यक्ती कौशल्याधारित व्यवसाय जसे की शिवणकाममोबाईल दुरुस्तीसंगणक सेवाब्यूटी पार्लरइलेक्ट्रिकल कामेसुतारकामवाहन दुरुस्तीकिरकोळ व्यवसाय इत्यादी सुरू करण्यास इच्छुक असतातमात्र आवश्यक साधनसामग्रीच्या अभावामुळे त्यांना अडचणी येतात. महाराष्ट्र शासनाच्या विकसित महाराष्ट्र२०४७ या कृती आराखड्यातील दिव्यांग सक्षमीकरणविषयक रोजगार व स्वयंरोजगार या ध्येयाचा एक भाग या पार्श्वभूमीवर ही योजना कार्यान्वित केली आहे.

 

ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गांसाठी लागू असून प्रशिक्षित दिव्यांग अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. या योजनेमध्ये प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येत असून निधी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटीपद्धतीने आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे करण्यात येणार आहे. निधी वितरित झाल्यानंतर लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा करण्यात येईल.

शासनाच्या या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असूनत्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास हातभार लागणार आहे. तसेचही योजना दिव्यांग व्यक्तींना उद्योजकतेकडे प्रवृत्त करून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनास चालना देणारी ठरणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून या योजनेकरिता नोंदणी करावी व योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन दिव्यांग कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान

 डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान

 

मुंबई, दि. 1 ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या महाराष्ट्र लोकभवन येथे श्री सदस्यांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती यांच्या हस्ते लोकभवन प्रवेश द्वाराजवळ अभियानाचे उद्घाटन झाले.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 14 वर्षांपासून लोकभवन  येथे स्वच्छता व वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धनाचे कार्य केले जात असल्याबद्दल राममूर्ती यांनी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे कौतुक केले तसेच भविष्यात देखील स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचे कार्य सुरु ठेवण्याचे आवाहन केले. जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

       आजच्या स्वच्छता अभियानात जवळपास 200 श्री सदस्यांनी भाग घेतला.

0000

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंमलबजावणीचा आढावा देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर

  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंमलबजावणीचा आढावा

 

देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर

-         महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई, दि. 1 : राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-1)’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिलाविद्यार्थी यांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे जलद व प्रभावी निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिक परिणामकारकपणे शिबिरांचे आयोजन करावेअसे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख संचालक यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले की, महसूल सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पारदर्शक आणि जलद गतीने पोहोचवणे ही शासनाची प्राथमिकता आहे. फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमी लेयर अशी विविध प्रकारची प्रमाणपत्रे, अकृषक परवानगी, गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा या शिबिरांद्वारे तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. कोणताही नागरिक प्रलंबित प्रश्नामुळे त्रस्त राहू नये यासाठी कालमर्यादेत प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात यावा. पुढील दोन वर्षांत विभागातील प्रलंबित कामे, कार्यालयांचे आधुनिकीकरण, ऑनलाईन सुविधा आणि जमाबंदी यंत्रणा अधिक सक्षक करण्याचे नियोजन करून प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची गरज भासू नये, हीच या अभियानाची खरी फलश्रुती ठरावी. भूमी अभिलेख नोंदींचे अद्ययावतीकरण, डिजिटायझेशन, ऑनलाईन सेवा सुलभ करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे यावर विशेष भर देण्यात यावा. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेत न्याय मिळावा, अशी भूमिका मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केली.

महाराजस्व समाधान शिबीर’ या अभियानाचा पहिला टप्पा मार्च ते मे 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून राज्यात 7 आणि 14 मार्च, 10 आणि 17 एप्रिल तसेच 8 आणि 15 मे या कालावधीत विविध स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे. या शिबिरांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी याकरिता व्यापक प्रसिद्धी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. दैनंदिन कामकाजाचा अधिक गतीमान होण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. यानुसार महसूल यंत्रणेने काम केल्यास राज्यातील महसूल सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून महाराष्ट्र देशात आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi