Thursday, 26 February 2026

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट · २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट

 राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट

·        २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट

मुंबईदि. २५ : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये १,४२७ अपघाती मृत्यू झाले होतेतर जानेवारी २०२६ मध्ये ही संख्या १,३१२ वर आली आहे. म्हणजेच ११५ मृत्यूंनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे अपघातांची एकूण संख्या ३,१६४ वरून ३,१०० वर आली असून त्यात २ टक्क्यांची घट झाली आहे.

रस्ता सुरक्षा उपायांमुळे अनेक जिल्ह्यांत मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. नंदूरबार येथे ५० टक्केसोलापूर शहर व वाशिम येथे प्रत्येकी ३६ टक्केसिंधुदुर्ग येथे २९ टक्केवर्धा येथे २८ टक्केधाराशिव येथे २४ टक्केगोंदिया व अमरावती ग्रामीण येथे प्रत्येकी २२ टक्केतर नांदेड व नागपूर शहर येथे प्रत्येकी २१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

राज्यातील अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्य व जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र रस्ता सुरक्षा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्सवर सुधारणा करण्यात येत आहेत.

नियमभंगाविरोधात कारवाईसाठी राज्यात ३३२ पथके कार्यरत असून रडार व इंटरसेप्टर वाहनांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट नसलेल्या ८९,६५१ चालकांवर मागे बसलेल्या व हेल्मेट न घातलेल्या १३,३४८ प्रवाशांवरवेगमर्यादा उल्लंघनाच्या ८,५२० तसेच सीटबेल्ट न वापरणाऱ्या चालकांवर ८,०२४ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तसेच अवैध पीयूसीअवैध विमा व ट्रिपल रायडिंगविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. हेल्मेट व सीटबेल्ट सक्तीकरिता एआय आणि रडार तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे.

वाहनांची तांत्रिक स्थिती योग्य राहावी यासाठी ५३ शासकीय व १३ खाजगी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे (एटीएससुरू करण्यात येत आहेत. कुशल वाहनचालकांनाच परवाना देण्यासाठी ३८ स्वयंचलित वाहन चाचणी पथ (एडीटीटीसुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे २५ हजार किलोमीटर रस्त्यावर आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएसबसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर अपघातांत १९ टक्क्यांची घट झाल्याचा दावा विभागाने केला आहे.

अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये तात्काळ उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारची पीएम राहत’ योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र अपघातग्रस्तांना सात दिवसांपर्यंत व दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. अपघाताच्या वेळी ११२ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयाची माहिती मिळू शकते. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या जीवनदूत’ व्यक्तींना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

परिवहन विभागाच्या मतेतंत्रज्ञानाधिष्ठित अंमलबजावणीकडक कारवाई आणि जनजागृती मोहिमांमुळे राज्यात अपघाती मृत्यू कमी करण्यास यश मिळत असून २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याच्या उद्दिष्टाकडे राज्याची वाटचाल सुरू आहेअसे परिवहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी कळविले आहे.

0000

जागृत समाजामुळेच कल्याणकारी कार्यक्रमांना बळ –

 जागृत समाजामुळेच कल्याणकारी कार्यक्रमांना बळ – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ब्रम्हकुमारीजचा नागपुरातील विश्वशांती सरोवर परिसर हा अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे कार्य करीत असून ही प्रेरणादायी भूमी असल्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. जागृत समाज हा शासनाच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांना बळ देतो. हाच संदेश पुढे नेत एकता व विश्वासावर आधारित ब्रह्मकुमारीजचे अभियान हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. मानवतेला पुढे नेणारा हा उपक्रम विकसित महाराष्ट्राच्या  वाटचालीत  योगदान देईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

         तत्पूर्वीब्रह्मुकुमारी सेवकांना कलश व ध्वज प्रदान करून राष्ट्रपतींनी मोहिमेचा शुभारंभ केला.

      ब्रह्मकुमारीज नागपूरच्या प्रमुख राजयोगिनी बी.के. रजनी दीदी यांचे स्वागतपर भाषण झाले. ब्रह्मकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी.के. मृत्युंजय भाई यांनी ब्रह्मकुमारीजच्या वतीने महाराष्ट्रात सुरू होत असलेल्या मोहिमेविषयी माहिती दिली.राजयोगिनी बी.के.चंद्रिका दीदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

       या राज्यव्यापी मोहिमेसाठी ब्रह्माकुमारीजमार्फत आठ सिद्धांत निश्चित करण्यात आले आहेत. यात व्यसनमुक्त समाजाची निर्मितीशाश्वत जीवन पद्धतीस्वच्छता व नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीत कर्तव्याचे भानमानवतेसाठी कर्तव्यतत्परतामूल्याधारित शिक्षणनिर्मळ व संयमी जीवन-योगाहरित व शाश्वत महाराष्ट्रसुसंवादातून आनंदी जीवन यावर भर दिला आहे. या सिद्धांतातूनच महाराष्ट्रात स्वर्णिम युगाचा प्रत्यय अधिक बळकट होणार असून राज्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील ब्रह्मकुमारीजच्या केंद्रांमार्फत ही मोहीम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

 

एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून भारतात सुवर्णयुग अवतरेल

 एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून भारतात सुवर्णयुग अवतरेल

                                                  -राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

·         ब्रह्मकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ

नागपूरदि. २५ : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या राज्याने देशाला दिशा दिली. याच भूमीत नकारात्मक विचार त्यागून सकारात्मकतेची कास धरत आंतरिक शांतीपरस्पर सौहार्दतेतून  ब्रह्मकुमारीजच्या एकता आणि विश्वासाची मोहीम प्रभावीपणे कार्य करेल व महाराष्ट्रासह देशात सुवर्णयुग अवतरेलअसा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केला.

          एकमेकांप्रती विश्वास-सौहार्दता-एकता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक अधिक वृद्धिंगत व्हावीयासाठी एकता व विश्वासाने महाराष्ट्राचे स्वर्णयुग’ या ब्रह्मकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जामठातील विश्वशांती सरोवर येथे झाला. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होत्या. राज्यपाल आचार्य देवव्रतमहसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमाऊंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाईराजयोगिनी बी. के. चंद्रिका दीदीब्रह्मकुमारीज नागपूरच्या प्रमुख राजयोगिनी बी. के. रजनी दीदी आदी यावेळी उपस्थित होते.

ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नाव ·

 ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

यांचे बेलासीस पुलाला नाव

·         मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

·         दक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाचे नाव बदलण्यासाठी कौशल्य मंत्री लोढा यांचा पाठपुरावा

 

मुंबईदि.२५ : कौशल्य,रोजगारउद्योजकता व नाविन्यता  मंत्री तथा मुंबईचे सह पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार  मानले आहेत.

ब्रिटिशांच्या खुणा सांगणाऱ्या या पुलाचे नाव  मेजर जनरल जॉन बेलासिस असे होते. हे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी सातत्याने मुंबई महापालिकेकडे तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मागणीला मान्यता देऊन  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान केला आहे.

 मोडकळीला आलेल्या या पुलाची पुनर्बांधणी आता पूर्ण झाली असून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन या पुलाचे उद्घाटन होणार आहे.

यासंदर्भात आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा म्हणाले कीआदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार भारताच्या वसाहतकालीन भूतकाळाची आठवण करून देणाऱ्या पाऊलखुणा पुसून भारतीयत्वाचा  सन्मान करणारे आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये महानगरपालिकेने मुंबईतील जुन्या कर्नाक पुलाचे सिंदूर ब्रिज’ असे नामांतर केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरार्थ राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले होतेअशी माहिती ही मंत्री लोढा यांनी दिली.

 

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक

 शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणालेशालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारीकिसान सभासेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनअहिल्यानगरचे पदाधिकारी उपस्थित होते.

वनहक्क व सामूहिक वनपट्टेधारक आदिवासी बांधवांकडून आदिवासी विकास महामंडळाने

 आदिवासी विकास मंत्री वुईके म्हणालेवनहक्क व सामूहिक वनपट्टेधारक आदिवासी बांधवांकडून आदिवासी विकास महामंडळाने लागू असलेल्या शेतमालावरील बोनसचा लाभ द्यावा. तसेच महामंडळाने या आदिवासी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करावा. ॲग्रीस्टॅकमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन धारणाबाबत आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेचा डाटा घेण्यात यावा. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करण्यात यावा.

वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मालकी हक्कासाठी शासन प्रयत्नशील

 वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना

स्वतंत्रपणे मालकी हक्कासाठी शासन प्रयत्नशील

-आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके

लाँग मार्च आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन

मुंबईदि. २५ : आदिवासी बांधवशेतकरीकामगारमहिला परिचर आणि शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सकारात्मक आहे. काही मागण्यांवर कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मालकी हक्क देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यामुळे लाँग मार्च आंदोलन स्थगित करावेअसे आवाहन आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बांधवशेतकरीकामगारमहिला परिचर आणि शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

Featured post

Lakshvedhi