वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना
स्वतंत्रपणे मालकी हक्कासाठी शासन प्रयत्नशील
-आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके
लाँग मार्च आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २५ : आदिवासी बांधव, शेतकरी, कामगार, महिला परिचर आणि शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सकारात्मक आहे. काही मागण्यांवर कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मालकी हक्क देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यामुळे लाँग मार्च आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बांधव, शेतकरी, कामगार, महिला परिचर आणि शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment