एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून भारतात सुवर्णयुग अवतरेल
· ब्रह्मकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ
नागपूर, दि. २५ : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या राज्याने देशाला दिशा दिली. याच भूमीत नकारात्मक विचार त्यागून सकारात्मकतेची कास धरत आंतरिक शांती, परस्पर सौहार्दतेतून ब्रह्मकुमारीजच्या एकता आणि विश्वासाची मोहीम प्रभावीपणे कार्य करेल व महाराष्ट्रासह देशात सुवर्णयुग अवतरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केला.
एकमेकांप्रती विश्वास-सौहार्दता-एकता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी ‘एकता व विश्वासाने महाराष्ट्राचे स्वर्णयुग’ या ब्रह्मकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जामठातील विश्वशांती सरोवर येथे झाला. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होत्या. राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माऊंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी बी. के. चंद्रिका दीदी, ब्रह्मकुमारीज नागपूरच्या प्रमुख राजयोगिनी बी. के. रजनी दीदी आदी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment