Monday, 23 February 2026

आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प असल्याचे सांगत

 आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प असल्याचे  सांगत आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, रुग्णांना केवळ उपचार नव्हे, तर धीर व समाधान देणारी सेवा हीसुद्धा  आरोग्यसेवा आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम आणि मेनोपॉज क्लिनिक राज्यात आरोग्य सेवेचे नवे मापदंड निर्माण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, 14 जानेवारीपासून राज्यातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालये अशा  580 ठिकाणी मेनोपॉज क्लिनिक सुरू आले आहेत.  मेनोपॉज क्लिनिकच्या माध्यमातून मातृशक्ती, स्त्रीशक्ती सक्षम व आरोग्य संपन्न करण्याचे काम होऊन ही रुग्णालये महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील. राज्यातील सामान्य नागरिकांचे आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी व आरोग्य संपन्न महाराष्ट्र राखण्यासाठी आरोग्याचा ध्यास, महाराष्ट्राचा विकास हे आरोग्य विभागाचे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी पार पडावी, असे आवाहनही आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.

            या समारंभात आरोग्य दिनदर्शिका, जन्म मृत्यू नोंदणी मार्गदर्शक पुस्तिकेसह विविध प्रकाशने आणि आशा स्वयंसेविकेसाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन यांनी केले.

उपचारांपलीकडील शासनाची साथ’ या संकल्पनेतून राज्यात पॅलियेटिव्ह केअर

 आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘उपचारांपलीकडील शासनाची साथ’ या संकल्पनेतून राज्यात पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रूग्णांना शारीरिक वेदना नियंत्रण, मानसिक-सामाजिक आधार, कुटुंबीय समुपदेशन, घरपोच सेवा व जीवनाच्या अंतिम टप्प्यात सन्मानपूर्वक काळजी मिळावी हा 'महाराष्ट्र पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.  तसेच महिलांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेले मेनोपॉज क्लिनिक हे महिलांच्या आरोग्य सेवेत नवा मापदंड असल्याचे त्यांनी सांगितले.

            आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक करत सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, रुग्णांशी नम्र संवाद हाच उपचाराचा पहिला टप्पा आहे. पुढील काळात राज्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी   डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना आवश्यक असलेले  प्रशिक्षण देऊन त्यांची कौशल्यवृद्धी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

पुरस्कार हे केवळ कौतुक नसून जबाबदारी वाढवणारा आणि इतरांसाठी आदर्श ठरणारा सन्मान असल्याचे सांगत  आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी पुरस्कार प्राप्त स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, पत्रकार यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जनतेला सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचेही आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले.

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा

 पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल;

 राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

-------
 पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व  मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

 वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 चे वितरण

 
            मुंबई, दि. 22 :-  राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र  घडविण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्यात  'पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ, मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान 2026 चे वितरण  सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

            यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी, आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, आयुक्त कादंबरी बलकवडे,  संचालक डॉ. नितीन अंबाडेकर  व विजय कंदेवार, यांच्यासह  आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नेदरलँड्समधील वॅगेनिंगेन विद्यापीठ आणि संशोधन संस्था (डब्ल्यूयूआर) यांच्यासोबत सामंजस्य करार

 नेदरलँड्समधील वॅगेनिंगेन विद्यापीठ आणि संशोधन संस्था (डब्ल्यूयूआर) यांच्यासोबत सामंजस्य करार

महाराष्ट्र शासनाच्या महा-अ‍ॅग्री एआय धोरण 2025-2029 अंतर्गत नेदरलँड्समधील वॅगेनिंगेन विद्यापीठ आणि संशोधन संस्था (डब्ल्यूयूआर) यांच्यासोबत सामंजस्य करारकरण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार आणि प्रभावी वापर वाढविण्यासाठी स्थापन केलेल्या आर्टिफिशिंअल इंटेलिजन्स फॉर अग्रीकल्चर रिसर्च या नेटवर्कमध्ये सहभागी होण्यासाठी नेदरलँड्समधील वॅगेनिंगेन विद्यापीठ आणि संशोधन संस्था (डब्ल्यूयूआर)  यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. हा करार महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सहकार्य वाढविण्यास उपयुक्त ठरणार आहे.

एआय फॉर ॲग्री 2026  ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक, इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर दी सेमी ॲरीड ट्रॉपीक्स (आयसीआरएसएटी), भारतीय विज्ञान संस्था, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन तसेच जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत.

0000

महाराष्ट्र केवळ एआय वापरकर्ता न राहता, जबाबदार आणि परिणामकारक कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे अग्रगण्य राज्य

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र केवळ एआय वापरकर्ता न राहता, जबाबदार आणि परिणामकारक कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे अग्रगण्य राज्य बनेल. प्रत्येकाकडे स्मार्टफोन नाही, प्रत्येक शेतकरी अ‍ॅप वापरत नाही आणि प्रत्येकाला मराठीतच माहिती हवी असेही नाही. म्हणूनच शासनाने बहुभाषिक आणि व्हॉइस-आधारित डिजिटल सुविधा सुरू केल्या आहेत. यासाठी स्थानिक भाषांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे शेतकरी डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर करत आहेत. पुढील काळात ही सेवा प्रत्येक तालुका आणि गावापर्यंत विस्तारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. शेतकऱ्यांसाठी महा एआय इनोव्हेशन सेंटरद्वारे विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योग यांना एकत्र आणून एक सक्षम आणि उपयुक्त परिसंस्था (इकोसिस्टम) उभी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारताने डिजिटल पायाभूत सुविधा आणि एआयला राष्ट्रीय विकासासाठी महत्वाचे स्थान

   मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने डिजिटल पायाभूत सुविधा आणि एआयला राष्ट्रीय विकासासाठी महत्वाचे स्थान दिले आहे. इंडिया एआय मिशनचा उद्देश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समावेशकता, पारदर्शकता आणि व्यापक परिणामकारकता आहे. शेती हे प्रत्येक घराशी व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडित असलेले क्षेत्र आहे. कृषी क्षेत्राला पुढे नेण्याचा संकल्प करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य एआय क्रांतीत आघाडीवर राहिल. सर्वसमावेशक एआय कृषी धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.

            शेतकऱ्यांसाठी महा-विस्तार एआय हा डिजिटल साथीदार विकसित करण्यात आला आहे. याच्या सहाय्याने शेती विषयक सल्ला, हवामान व कीड व्यवस्थापनाविषयी माहिती, बाजार भावाचे संकेत आदींसह शासकीय योजनांपर्यंत सुलभ प्रवेशही मिळणार आहे. आतापर्यंत ३० लाख शेतकऱ्यांपर्यंत हे ॲप पोहचले असून नोंदणीमध्ये वाढ होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६

 महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025-2029 ’ धोरणांतर्गत येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६) च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक परिमल सिंह, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi