आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प असल्याचे सांगत आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, रुग्णांना केवळ उपचार नव्हे, तर धीर व समाधान देणारी सेवा हीसुद्धा आरोग्यसेवा आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम आणि मेनोपॉज क्लिनिक राज्यात आरोग्य सेवेचे नवे मापदंड निर्माण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, 14 जानेवारीपासून राज्यातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालये अशा 580 ठिकाणी मेनोपॉज क्लिनिक सुरू आले आहेत. मेनोपॉज क्लिनिकच्या माध्यमातून मातृशक्ती, स्त्रीशक्ती सक्षम व आरोग्य संपन्न करण्याचे काम होऊन ही रुग्णालये महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील. राज्यातील सामान्य नागरिकांचे आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी व आरोग्य संपन्न महाराष्ट्र राखण्यासाठी आरोग्याचा ध्यास, महाराष्ट्राचा विकास हे आरोग्य विभागाचे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी पार पडावी, असे आवाहनही आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.
या समारंभात आरोग्य दिनदर्शिका, जन्म मृत्यू नोंदणी मार्गदर्शक पुस्तिकेसह विविध प्रकाशने आणि आशा स्वयंसेविकेसाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन यांनी केले.
No comments:
Post a Comment