आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘उपचारांपलीकडील शासनाची साथ’ या संकल्पनेतून राज्यात पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रूग्णांना शारीरिक वेदना नियंत्रण, मानसिक-सामाजिक आधार, कुटुंबीय समुपदेशन, घरपोच सेवा व जीवनाच्या अंतिम टप्प्यात सन्मानपूर्वक काळजी मिळावी हा 'महाराष्ट्र पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच महिलांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेले मेनोपॉज क्लिनिक हे महिलांच्या आरोग्य सेवेत नवा मापदंड असल्याचे त्यांनी सांगितले.
आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक करत सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, रुग्णांशी नम्र संवाद हाच उपचाराचा पहिला टप्पा आहे. पुढील काळात राज्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देऊन त्यांची कौशल्यवृद्धी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
पुरस्कार हे केवळ कौतुक नसून जबाबदारी वाढवणारा आणि इतरांसाठी आदर्श ठरणारा सन्मान असल्याचे सांगत आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी पुरस्कार प्राप्त स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, पत्रकार यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जनतेला सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचेही आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले.
No comments:
Post a Comment