Monday, 23 February 2026

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर

 पायाभूत सुविधागुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या

प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर

राज्यपाल आचार्य देवव्रत

मुलभूत सुविधासीमावादउद्योगशेतीशिक्षण  सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत

शासनाचा व्यापक दृष्टीकोन

                                                                               

                मुंबईदि. 23  : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत वाढविण्यासाठी राज्य शासन कृतिशिल आहे. पायाभूत सुविधागुंतवणूक, आणि जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाचा भर आहेराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या विधेयकांवर विधीमंडळ सदस्यांनी विधायक चर्चा करावीअसे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केले.

            राज्य विधानमंडळाच्या 2026 या वर्षातील पहिल्या अधिवेशनाची सुरूवात राज्यपाल अभिभाषणाद्वारे झालीत्यावेळी राज्यपाल देवव्रत बोलत होतेविधानमंडळात अभिभाषणाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमंत्रीमंडळाचे सर्व सदस्य तसेच दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi