‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025-2029 ’ धोरणांतर्गत येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६) च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक परिमल सिंह, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर आदी उपस्थित होते.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 23 February 2026
कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-एआय फॉर ॲग्री 2026 परिषदेचे उद्घाटन
-कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे लोकार्पण
मुंबई, दि.22: शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून शेती विषयक प्रश्नांचे उत्तर त्वरित मिळवू शकतात. महा-एआय इनोव्हेशन सेंटरद्वारे विद्यापीठे, संशोधन संस्था, उद्योग यांना एकत्र आणून एका डिजिटल सक्षम परिसंस्थेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचा सर्वसमावेशक विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
एक स्टेप फाउंडेशन आणि जागतिक बँक यांच्यातील महत्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी
एक स्टेप फाउंडेशन आणि जागतिक बँक यांच्यातील महत्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी
एक स्टेप फाउंडेशन आणि जागतिक बँक यांच्यातील महत्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या एआय-सक्षम डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था ‘महाविस्तार’ (MahaVISTAAR) यांच्या स्थापत्य रचना (Architectural Design), प्रशासकीय व शासन चौकट (Governance Frameworks), अंमलबजावणीतील अनुभव व धडे (Implementation Lessons) तसेच मुक्त मानके (Open Standards) यांचे पद्धतशीर दस्तऐवजीकरण व संकलन करण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. हा सामंजस्य करार कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.
Sunday, 22 February 2026
संपूर्ण भारतातील ८१ मंदिरांतील ८१ गणपतींचे ८१ सेकंदात दर्शन घ्या... ह्यात 🚩 मुंबईचा सिद्धिविनायक आणि बेंगळुरूचा दोड्डा गणेश यांच🚩
संपूर्ण भारतातील ८१ मंदिरांतील ८१ गणपतींचे ८१ सेकंदात दर्शन घ्या... ह्यात 🚩 मुंबईचा सिद्धिविनायक आणि बेंगळुरूचा दोड्डा गणेश यांचा समावेश आहे 🚩 🙏🌹🙏🪷🙏💐
किती आहे हे महत्वाचे नसुन हक्काचे आहे ह्याला महत्व आहे
आई, तु पण ना… काय हे? बाबांच्या फक्त १२,००० रुपयांच्या पेन्शनसाठी इतकी धावपळ कशाला? 😒
आपण आपल्या एका कर्मचाऱ्याला यापेक्षा जास्त पगार देतो…
मोहित चिडून आईला म्हणाला. State Bank of India च्या लांब रांगेत उभं राहण्यापेक्षा घरी जाऊ या असा तो आग्रह करू लागला.
मोहितचं म्हणणं काही अंशी खरंच होतं. त्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय होता 💼💰. वर्षभरात लाखो रुपये पगार-भत्त्यांत जात होते. मग फक्त १२,००० रुपयांसाठी इतका वेळ का घालवायचा?
मोहितचे वडील एकनाथराव गेल्या महिन्यात अल्पशा आजाराने वारले होते 😔. ते सरकारी शाळेत प्राध्यापक होते आणि १२ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांना पेन्शन मिळत होती. त्यांच्या निधनानंतर शासनाच्या नियमानुसार अर्धी पेन्शन त्यांच्या पत्नी सरला यांना मिळणार होती. त्यासाठीच आज त्या बँकेत औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या.
त्या दिवशी मोहितचा मुलगा कुशाग्रचा आठवा वाढदिवस होता 🎂🎉. त्याने आजीकडे सायकलची मागणी केली होती 🚲. सरलाताईंच्या खात्यात फारसे पैसे उरले नव्हते. म्हणून त्यांनी मोहितकडे १०,००० रुपये मागितले.
मोहित ऑफिसला निघायच्या तयारीत होता. थोडं आश्चर्याने पाहून त्याने पत्नी श्रेयाला आईला पैसे द्यायला सांगितले.
श्रेयाने पैसे देताना हलकंसं म्हणाली,
“आजकाल खूप मंदी आहे बरं का… जरा सांभाळून खर्च करा.” 💬
संध्याकाळी सरलाताईंनी त्या पैशांतून कुशाग्रसाठी सायकल घेतली 🚲😊 आणि घरात पुन्हा हशा-आनंद पसरला.
पण पुढच्या आठवड्यात मोहितची मोठी बहीण माहेरी आली. आधी एकनाथजी जिवंत असताना सरलाताईंना कधीच पैशांसाठी कुणाकडे पाहावं लागत नव्हतं. ते स्वतःच पेन्शनमधून त्यांना थोडेफार पैसे देत असत ❤️.
आता मात्र मुलीच्या निरोपासाठीही त्यांना सुनबाईकडे हात पसरावा लागला. श्रेयाचे तेच शब्द त्यांच्या मनात घुमत होते —
“मंदी आहे… जपून खर्च करा…” 😞
मन खट्टू करून त्या मुलीला रिकाम्या हाताने निरोप देऊ लागल्या, तेवढ्यात श्रेया स्वतः पुढे आली आणि २००० रुपये त्यांच्या हातात ठेवत म्हणाली,
“मुलीला रिकाम्या हाताने कसं पाठवणार?”
पण त्या शब्दांत आपलेपणा कमी आणि टोमणा जास्त होता… हे सरलाताईच्या मनाला जाणवलं 💔.
सरलाताईंच्या आयुष्यात पैशांची खरी कमतरता नव्हती. औषधं, रिचार्ज, छोट्या गरजा—मोहित लगेच पैसे देत असे. पण मंदिरात दान करायचं असो 🛕, सणासुदीला नोकरांना काही द्यायचं असो 🎁, नातेवाईकांना भेट द्यायची असो… प्रत्येक वेळी मागणं त्यांच्या स्वाभिमानाला टोचत होतं.
अलीकडे त्यांची बहीण आली होती. तिची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तिला मदतीची अपेक्षा होती. पण सरलाताई स्वतःच पैशासाठी सुनेकडे पाहताना दिसल्यावर तिने काहीच मागितलं नाही 😔.
आणि मग एक दिवस… 📱
मोबाईलवर मेसेज आला — State Bank of India कडून.
सहा महिन्यांची पेन्शन — ७२,००० रुपये — त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा संदेश होता 💳✨
सरलाताई जवळच्या ATM मधून १०,००० रुपये काढून घरी येत होत्या. त्यांच्या चालण्यातला आत्मविश्वास, चेहऱ्यावरचे तेज सांगत होतं — पेन्शनला “सन्मान निधी” का म्हणतात ते 💖🙏
कोट्यवधींच्या संपत्तीपेक्षा त्यांच्या पतींच्या त्या १२,००० रुपयांच्या पेन्शनमध्ये त्यांना अधिक वजन, अधिक आधार आणि सर्वात महत्त्वाचं — स्वाभिमान जाणवत होता.
एआयच्या यशासाठी धोरणात्मक संरचना आणि अर्थकारण महत्त्वाचे
एआयच्या यशासाठी धोरणात्मक संरचना आणि अर्थकारण महत्त्वाचे
तंत्रज्ञान, निधी आणि इच्छाशक्ती सोबतच अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासनिक रचना आवश्यक असल्याचे नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक संजीव डी. रोहिल्ला यांनी यावेळी सांगितले. देशात डेटा अभावाचा प्रश्न नाही. कृषी विद्यापीठे आणि विस्तार यंत्रणा यामुळे मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे. एआय ही केवळ त्या डेटावर आधारित पूरक प्रणाली आहे. मात्र एआयचा खरा उपयोग स्थानिक गरजा ओळखून त्यानुसार उपाय देण्यात होत आहे. एआय आणि कृषी सुधारणा हे व्यापक आर्थिक वास्तव आणि अर्थकारणाच्या चौकटीत पाहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शाश्वत व्यवसायासाठी एआयचा संदर्भ महत्त्वाचा
शाश्वत व्यवसायासाठी एआयचा संदर्भ महत्त्वाचा
कोणताही कृषी व्यवसाय शाश्वत आणि ‘युनिट इकॉनॉमिक्स’दृष्ट्या व्यवहार्य असणे गरजेचे आहे. मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज असलेल्या सेवांसाठी शासनाची भूमिका महत्वाची ठरत असल्याचे अॅक्यूमनचे सहयोगी संचालक (पोर्टफोलिओ) पराग सभलोक यांनी यावेळी सांगितले. भारत सरकारने ॲग्रीस्टॅक (AgriStack) आणि विस्टा (VISTA) सारख्या पायाभूत प्रणाली उभारून दूरदृष्टी दाखवली आहे. आता मत्स्यव्यवसाय, फळभाज्या आणि सुका मेवा यासारख्या उच्च-मूल्य पिकांवर भर दिला जात आहे. एआय ही जादूची काठी नसून, योग्य संदर्भ आणि विद्यमान प्रणालीत छोटे पण प्रभावी बदल करून वापरल्यास त्याचे खरे फायदे मिळू शकतात. भविष्यात उपग्रह प्रतिमा, जमीन नकाशांकन आणि पीक नोंद यासारख्या क्षेत्रात एआयमुळे स्टार्टअप्सना अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...