Friday, 20 February 2026

भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र शाखेतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न ·

 भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र शाखेतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

·         शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस चे महत्व याविषयी मार्गदर्शन

 

मुंबई, दि.२० : भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने विविध विषयांवर  एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय लोक प्रशासन संस्था प्रादेशिक शाखा मंत्रालय, मुंबईचे मानद खजिनदार  विकास विनायक देवधर आणि विशेष कार्य अधिकारी शशांक यशवंत बर्वे  यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टल यासंदर्भात उद्योग संचालनालयाचे उपसंचालक (मध्यवर्ती भांडार खरेदी संघटना)  नितीन कोळेकर आणि उद्योग संचालनालयातील  जीईएम पोर्टलचे तज्ञ कार्यकारी शैलेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.


पर्यावरण क्षेत्रात पदाधिकाऱ्यांना काम करण्यास प्रोत्साहन

 पर्यावरण क्षेत्रात पदाधिकाऱ्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ व ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ चा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सन्मान सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार विजेत्यांचा गौरव शानिवार,२१ फेब्रुवारी, २०२६ रोजी डोम वरळी, मुंबई येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. पर्यावरण क्षेत्रात पदाधिकाऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक स्तरावर पर्यावरण चळवळ अधिक बळकट व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

माझी वसुंधरा अभियानातील स्पर्धेचा शनिवारी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा

 माझी वसुंधरा अभियानातील स्पर्धेचा शनिवारी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा

- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

 

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार विजेत्यांचा गौरव

 

मुंबई, दि. १९ :- पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६ रोजी डोम वरळी, मुंबई येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.  

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने राबविलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाने राज्यात व्यापक जनसहभागातून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणारा हा पहिलाच एकात्मिक आणि अभिनव उपक्रम असून २ ऑक्टोबर २०२० पासून तो मिशन मोड पद्धतीने सुरू आहे.

पर्यावरण क्षेत्रात पदाधिकाऱ्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ व ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ चा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सन्मान सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार विजेत्यांचा गौरव शानिवार,२१ फेब्रुवारी, २०२६ रोजी डोम वरळी, मुंबई येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. पर्यावरण क्षेत्रात पदाधिकाऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक स्तरावर पर्यावरण चळवळ अधिक बळकट व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

सहकार्य आणि भागीदारी

 सहकार्य आणि भागीदारी

हा उपक्रम नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया  यांच्या सहकार्याने 'इनोव्हेशन चॅलेंज पार्टनर' म्हणून आणि सोशल अल्फा यांच्या सहकार्याने 'सपोर्ट पार्टनर' म्हणून आयोजित करण्यात आला होता. क्लायमेट कलेक्टिव्ह फाउंडेशन हे 'क्लायमेट रिडिझाइन चॅलेंज पार्टनर' म्हणून सहभागी झाले होते.

तरुणांसाठीचे विशेष 'युथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज' हे युवाह (युनिसेफ) च्या भागीदारीत राबवण्यात आले. ज्यामध्ये अन्न प्रणाली, शहरी लवचिकता आणि ऊर्जा संक्रमण या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

या चॅलेंजमुळे केवळ विजेते निवडले गेले नाहीत, तर त्यांना क्षमता बांधणी, मार्गदर्शन आणि गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज २०२६ चे विजेते

 एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज २०२६ चे विजेते

निवडण्यात आलेल्या आठ विजेत्यांनी भारतातील हवामान बदलाचा वेग कमी करण्यासाठी आणि लवचिकता मजबूत करण्यासाठी अत्यंत सक्षम आणि गुंतवणुकीसाठी तयार असलेले उपाय सुचविले आहेत.

प्रमुख विजेते:

 * एनलॉग (Enlog)

 * Temperate Technologies Private Limited

 * Fitsol Supply Chain Solutions

 * Indra Water

 * Bambrew

 * Torus Robotics

युथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज विजेते (१६ ते २४ वयोगटातील तरुण):

 * EnviroWealth

 * Decentralized Biochar Systems

मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज २०२६: आठ हवामान स्नेही नवोपक्रम विजेते घोषित

 मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज २०२६: आठ हवामान स्नेही नवोपक्रम विजेते घोषित

राज्यपाल आचार्य देवव्रत व पंकजा मुंडे यांच्या हस्ते वितरण

 

मुंबई, १९ : हवामान बदलावरील उपायांना चालना देण्यासाठी मुंबई क्लायमेट वीकच्या समारोपाच्या दिवशी एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज २०२६' च्या विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये भारत आणि ग्लोबल साउथ (विकसनशील देश) मधील आठ उच्च-प्रभावी हवामान नवोन्मेषकांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये तरुणांनी विकसित केलेल्या दोन उपायांचाही समावेश आहे.

हे पुरस्कार समारोपाच्या सत्रात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावर्षी ३५० हून अधिक स्टार्टअप्स आणि तरुण बदल घडवू पाहणाऱ्यांनी जलसंधारण, ऊर्जा कार्यक्षमता, मोबिलिटी, शाश्वत साहित्य आणि कार्बन अकाउंटिंग यासारख्या क्षेत्रांत पुरस्कारासाठी अर्ज केले होते. अर्जांच्या छाननीनंतर, ३४ अंतिम स्पर्धकांनी शेवटच्या फेरीत प्रवेश केला

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना

जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 

मुंबई, दि. 20: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

            यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छावविजय शिंदे,  जगदीश कुलकर्णी आदींसह मंत्रालयातील अधिकारीकर्मचाऱ्यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

 

Featured post

Lakshvedhi