Thursday, 19 February 2026

एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन

 एआय  फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन

-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

·         २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी होणार मुंबईत एआय फॉर अॅग्री २०२६ जागतिक परिषद

 

       मुंबई, दि.  : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) ही परिषद २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञकृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअपगुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इमारती विषयी थोडक्यात

 इमारती विषयी थोडक्यात

            इमारतीमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी बैठक व भोजनकक्षस्वागत कक्षउपहारगृहप्राथमिक शिक्षण कार्यालयसंचालक कार्यालयशिक्षण संचालक माध्यमिक व प्रौढ शिक्षण कार्यालयनोंदणी कक्षशालेय पोषण आहार कार्यालयग्रंथालयप्राथमिक शिक्षण परिषद व ई गव्हर्नन्स कार्यालयशिक्षण आयुक्त कार्यालय आणि विश्रामगृह यांचा समावेश आहे.

शालेय शिक्षण विभागाचे पुणे येथील आयुक्तालयाची इमारत विभागाचा लौकिक ठरणार

 शालेश्‍ शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, इमारतीमध्ये शिक्षण संचालक, शालेय पोषण आहार, प्राथमिक शिक्षण विभाग यांची कार्यालये व विश्रामगृह आहेत. इमारतीचे बांधकाम 414 चौरस मीटर जागेत होत आहे. इमारत परिसरात 377 वाहनांची क्षमता असलेले दोन वाहन तळ आहेत. तरी इमारतीच्या आवारात पुरेश्या पार्किंगची व्यवस्था असल्याची खात्री करावी.शालेय शिक्षण विभागाचे पुणे येथील आयुक्तालयाची इमारत विभागाचा लौकिक ठरणार आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम दर्जेदार करण्यात यावे. इमारत बांधकामाला विलंब करु नये असे निर्देशही त्यांनी दिले.

 

विभागाने संबंधित कंत्राटदाराकडून विविध कालमर्यादेत काम पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करावी. इमारत बांधकामातील सर्व अडचणी दूर करण्यात याव्याअसे निर्देशही राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिल्या.

शिक्षण आयुक्तालय इमारतीच्या कामाला गती द्या

 शिक्षण आयुक्तालय इमारतीच्या कामाला गती द्या

-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

 

मुंबईदि. 18: पुणे येथील शिवाजीनगर भागातील भांबुर्डा परिसरात शालेय शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षण आयुक्तालयाच्या इमारतीचे या इमारतीमुळे शालेय शिक्षण विभागाची कार्यालये एकाच छताखाली येतील. इमारतीचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कामाला गती द्यावीअसे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले.

 

मंत्रालयात आयोजित बैठकीत इमारत बांधकामाचा आढावा घेताना राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव एम.बी. ताशिलदारशालेय शिक्षण आयुक्तालयाचे सहसंचालक हारून अत्तारकक्ष अधिकारी शितल पाटील आदी उपस्थित होते.

संस्थांनी सेवा देताना गुणवत्ता, पारदर्शकता आणि विभागाने घालून दिलेल्या नियमांचे

 आरोग्य मंत्री आबिटकर म्हणालेसंस्थांनी सेवा देताना गुणवत्तापारदर्शकता आणि विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या संस्थांची नियमित तपासणी व मूल्यांकन करावे. करारातील अटींचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरोधात दंडात्मक कारवाईकरार रद्द करणेतसेच आवश्यक असल्यास काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी. बाह्य संस्थांमार्फत कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतनयासह सर्व बाबींची काटेकोर तपासणी करावीया कामात कुचराई करणाऱ्या व चुकीचे काम करणाऱ्या सेवा पुरवठादारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बाह्य स्त्रोत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेज्यायोगे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

 

बैठकीत राज्यभर सुरू असलेल्या सिकल सेल ॲनिमियाहत्तीरोगक्षयरोगमलेरिया रोग तपासणी व निर्मूलन मोहीममाता मृत्यू दर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमांचा आढावा व सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली. सामान्य नागरिकाला सरकारी दवाखाना हाच आधार आहे याची जाणीव ठेवून रुग्णांना चांगली वर्तणूकव आरोग्य सेवा देण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.

बाह्यस्त्रोत सेवा संस्थांनी दर्जेदार सुविधा द्याव्यात

 बाह्यस्त्रोत सेवा संस्थांनी दर्जेदार सुविधा द्याव्यात

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, दि. १८: आरोग्य विभागात बाह्य स्त्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) सेवा देणाऱ्या संस्थांच्या कामकाजात कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचेप्रसंगी काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 

            सार्वजनिक आरोग्य विभागात सिटीस्कॅनएमआरआयडायलेसिसस्टेमीएक्स रेरक्त तपासण्या (एचएसएल), आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८१०२१०८मनुष्यबळ पुरवठाआहार पुरवठास्वच्छता सेवातांत्रिक सहाय्यदेखभाल-दुरुस्ती,वाहन पुरवठा यासारख्या अनेक सेवा बाह्य (खासगी) यंत्रणेद्वारे दिल्या जातात. बाह्य स्त्रोतांद्वारे संलग्नित संस्थांनी कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन दिले पाहिजेरुग्णांना सकस आहारपुरवठास्वछता सेवा,यासह सर्व नियमांचे काटेकोर पालन होत असल्याबाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. पंधरा दिवसात त्याबाबतच्या अहवाल सादर करावा. अहवालात दोषी आढळल्यास संबंधित संस्थांची बिले थांबवावीत. तसेच त्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.  

पदयात्रा व गेट वे ऑफ इंडिया येथे सांस्कृतिक कार्यक्रम

 पदयात्रा व गेट वे ऑफ इंडिया येथे सांस्कृतिक कार्यक्रम

दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालययेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई टाऊन हॉल (सेंट्रल लायब्ररी)शहीद भगतसिंग रोडफोर्ट येथून गेट वे ऑफ इंडिया पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे शिवरायांच्या जीवनपटावर आधारित विविध प्रयोगात्मक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयतसेच जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


Featured post

Lakshvedhi