Thursday, 19 February 2026

‘लालपरी’ पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत

 लालपरी’ पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत

ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्याआदिवासी पाड्यांपर्यंत सेवादोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त गाड्या, या सर्वांमुळे एसटीची पकड पुन्हा मजबूत होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी लालपरी’ आता नव्या जोमानेनव्या ताफ्यासह आणि नव्या आर्थिक बळावर पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. यावर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईलहा आमचा दृढ विश्वास आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

लालपरी’ पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत

 लालपरी’ पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत

ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्याआदिवासी पाड्यांपर्यंत सेवादोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त गाड्या, या सर्वांमुळे एसटीची पकड पुन्हा मजबूत होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी लालपरी’ आता नव्या जोमानेनव्या ताफ्यासह आणि नव्या आर्थिक बळावर पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. यावर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईलहा आमचा दृढ विश्वास आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ साधण्याचा निर्धार

 खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ साधण्याचा निर्धार

सध्या एसटीचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपयेतर उत्पन्न सुमारे ३३ कोटी रुपये आहे. म्हणजेच रोजची तूट १ ते १.५ कोटींच्या घरात आहे.

मंत्री सरनाईक म्हणालेएसटी हा नफा कमावणारा उद्योग नाहीती राज्यातील सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र किमान तोटा टाळण्यासाठी खर्च-उत्पन्नाचा समतोल साधणे आवश्यक आहे. नवीन बसेस आल्यावर उत्पन्न निश्चित वाढेल आणि एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल

५,००० साध्या बसेस — निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी १०० मिडी बसेस तसेच २०० अत्याधुनिक बसेस

 ,००० साध्या बसेस — निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी १०० मिडी बसेस

तसेच २०० अत्याधुनिक बसेस

खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी या सर्व बसेस ताफ्यात आल्यावर दररोज ७० ते ७५ लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा महामंडळाचा मानस आहे.

कोरोना पूर्वीचा सुवर्णकाळ … आणि नंतरची घसरण

 कोरोना पूर्वीचा सुवर्णकाळ

… आणि नंतरची घसरण

कोरोना महामारीपूर्वी एसटीकडे १८ ते १९ हजार बसेस होत्या. दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत होते. मात्र महामारी आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या चार-पाच वर्षांत बसखरेदी रखडली. परिणामी २०२४ अखेर बसेसची संख्या घटून सुमारे १२,६०० वर आली. दरम्यानराज्य शासनाने महिलांना तिकिटात ५०% सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागला. सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतातमात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत.


यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार!,यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात दाखल होणार”

 यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास

 

यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात दाखल होणार

 

मुंबई, दि. 19 : दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतीलआणि प्रवासी वाढले तर उत्पन्न आपोआप वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

 किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणेदि. १९ : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलारआमदार शरद सोनवणेमाजी आमदार अतुल बेनकेकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारेजिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्लउपवनसंरक्षक आशिष ठाकरेअभिनेता रितेश देशमुखमराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi