‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ राज्यातील ४१९ शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना विना शुल्क प्रात्यक्षिकांसह आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणार असल्याचे अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांनी यावेळी सांगितले. मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका श्रीमती माधवी सरदेशमुख यांनी यावेळी सांगितले. तर शहरी आणि ग्रामीण भागातील विविध आपत्तीचा अभ्यास करून अकादमीने हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे. आपत्तीतील उपाययोजना आणि बचाव कार्य याचे प्रामुख्याने प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती अकादमीचे प्रतिनिधी हरीश महाजन यांनी दिली.यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायाचे सह संचालक श्री सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 18 February 2026
कोणतीही आपत्ती ही सांगून येत
कोणतीही आपत्ती ही सांगून येत नसते, आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो, अशा वेळी मानवी सुरक्षेला प्राधान्य देऊन यामध्ये युवांचा सहभाग वाढवून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला सहकार्य होण्यासाठी आपत्ती बचावकार्य करणारी यंत्रणा तयार करता येईल. आपत्तीचे व्यवस्थापन आणि बचावकार्य याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे,असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
आयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना
आयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना
‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि कौशल्य विभाग यांच्यात सामंजस्य करार
मुंबई दि.१८ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील दोन लाख आयटीआयच्या विद्यार्थ्यांना टप्याटप्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव असलेल्या ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि कौशल्य विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात आज यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सशक्त भारत घडवण्यासाठी देशवासियांसाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. योग दिन, खेलो इंडिया याचाच हा भाग आहे. तर राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागाकडून ही पारंपरिक खेळांचे महत्व नव्या पिढीला पटवून देण्यासाठी राज्यभरातील आयटीआयमध्ये क्रीडा महाकुंभ ही आयोजित करण्यात येतो. आता याच शृंखलेत जनसेवेच्या भावनेतून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबवून देशसेवेचे काम आयटीआय मध्ये होत असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केले.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान
नवी दिल्ली, 18 : भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या 16 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागासाठी ही निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. या निवडणुकीची 26 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2026 असेल. अर्जांची छाननी 6मार्च रोजी केली जाणार असून 9 मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. मतदान 16 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.
मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या विशेष जांभळ्या स्केच पेनचाच वापर करणे बंधनकारक असेल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत
फ्रान्स-भारत संयुक्त उपक्रमांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी आणि संशोधकांना
राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानुसार जी-७ परिषदेच्या आदल्या दिवशी ‘इनोव्हेशन डे’ आयोजित करण्यात येणार आहे. फ्रान्स-भारत संयुक्त उपक्रमांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी आणि संशोधकांना एकत्र आणले जाणार आहे. संरक्षण क्षेत्रात फ्रान्स ‘मेक इन इंडिया’चा ठाम आणि विश्वासू भागीदार आहे. फ्रान्सच्या सहकार्यामुळे पुढील पिढीचे इंजिन, बहुउद्देशीय हेलिकॉप्टर, अत्याधुनिक लढाऊ विमाने, पाणबुड्या आदींचा विकास शक्य होत आहे. या भागीदारीवर भारताने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभारही मानले.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन म्हणाले, हे केवळ संरक्षण करार किंवा करारांची मालिका नाही, ही एक सार्वभौम आघाडी आहे. दोन महान राष्ट्रे जमीन, समुद्र आणि आकाश या तिन्ही क्षेत्रांत एकमेकांची निवड केवळ पर्याय नसल्यामुळे नव्हे, तर ठाम विश्वासामुळे करतात. तेव्हा हे शक्य होते. अवकाश क्षेत्रातही सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘त्रिश्ना’ उपग्रहाचा विकास हा वैज्ञानिक उत्कृष्टता आणि औद्योगिक कौशल्य एकत्र आल्यास काय होते, याबाबत उत्तम उदाहरण म्हणून समोर येते.
भारत ' स्टार्टअप'मध्ये केवळ सहभागीदार नसून नेतृत्व करणारा देश
भारत ' स्टार्टअप'मध्ये केवळ सहभागीदार नसून नेतृत्व करणारा देश
- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन
यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, जगातील अनेक नामांकित कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे भारतीय आहेत. भारत हा केवळ जागतिक स्टार्टअप मध्ये सहभागी होत नाही, तर तो त्याचे नेतृत्व करतो. स्टार्टअप साठी शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये गुंतवणूक करणे अत्यावश्यक असते. फ्रान्स-भारत एरोनॉटिक्स कॅम्पस विशेष कौशल्य विकसित करण्याची संधी प्रदान करीत आहे. भारत स्टार्टअप करतो का, हा प्रश्न आता उरलेला नाही. खरा प्रश्न हा आहे, की भारतासोबत नवोपक्रम कोण करणार आणि त्याचे उत्तर म्हणजे फ्रान्स आहे. फ्रान्सला भारतासोबत उज्वल भविष्यासाठी काम करायचे आहे. भारत-फ्रान्स संबंध चिरायू राहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
भारत आणि फ्रान्स यांनी अनेक धोरणात्मक तंत्रज्ञान
भारत आणि फ्रान्सबद्दल बोलताना आमची भागीदारी केवळ स्टार्टअप वर आधारित नसून ती विश्वास आणि समान मूल्यांवर उभी आहे. या दृष्टीकोनातून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि मी २०२६ हे वर्ष ‘भारत–फ्रान्स स्टार्टअप वर्ष’ म्हणून घोषित केले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
भारत आणि फ्रान्स यांनी अनेक धोरणात्मक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सहकार्य केले असून परस्पर विश्वास अधिक दृढ केला आहे. दोन्ही देशांचे संबंध ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी या स्तरावर नेले आहेत, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...