Sunday, 15 February 2026

Strengthening the Rural Economy by Placing Livestock at the Center

 Strengthening the Rural Economy by Placing Livestock at the Center

– Chief Minister Devendra Fadnavis

CM Visits ‘Maha Pashudhan Expo 2026’;

Minister Pankaja Munde Announces ‘Livestock Entrepreneur’ Scheme

Parli Vaijnath (Feb 14): “Our mother and our soil are our true devotion. Just as we bow to Nandi before seeking the blessings of Lord Shiva, we are placing livestock at the center to strengthen the rural economy. With the integration of technology, this sector will position Maharashtra as a global leader in milk production,” expressed Chief Minister Devendra Fadnavis.

He was speaking after visiting the three-day Maha Pashudhan Expo 2026, organized by the Animal Husbandry Department at Ople Ground on the Ambajogai Road in Parli.Among those present were Animal Husbandry Minister Pankaja Munde, MLA Dhananjay Munde, MLA Ratnakar Gutte, Secretary (Animal Husbandry) Dr. Ramaswami N., Commissioner Dr. Praveenkumar Deore, Divisional Commissioner Jitendra Papalkar, District Collector Vivek Johnson, Vice-Chancellor of Maharashtra Animal & Fishery Sciences University Dr. Nitin Patil, and several senior officials and livestock farmers.

मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 * उदगीर प्रकल्प:  उदगीरचे दूध भुकटी केंद्र 100 कोटी खर्चून पुन्हा सुरू करणार.

 * नैसर्गिक शेती: रासायनिक खतांमुळे बिघडलेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गोमूत्र व शेणापासून तयार होणाऱ्या 'जीवामृता'ला प्रोत्साहन.

 *आरोग्य सेवा: राज्यातील 2841 पशु दवाखान्यांचे आधुनिकीकरण आणि फिरत्या पशु ॲम्ब्युलन्स सेवेचे जाळे.

 *विकास दर: पशुसंवर्धन क्षेत्राचा विकास दर सध्याच्या 4-8% वरून 25% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.

*राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 366 प्रकल्पांना मंजुरी.


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली, स्मृती दालनाचे उदघाटन

 दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजलीस्मृती दालनाचे उदघाटन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनामध्ये असलेल्या विविध पशुधनाची पाहणी केली. पाहणीत त्यांनी पशु पालकांचे कौतुक केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार स्मृती दालनाचे उदघाटनही त्यांनी केले. मुख्य कार्यक्रम ठिकाणी सुरुवातीला राष्ट्रगीतराज्यगीत झाल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परळी नगर परिषदेच्या स्व. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय गोपाल रत्न – 2025 पुरस्कार घोषणा करण्यात आली असून राज्यातील दोन पशुपालकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रगतीशील पशुपालक श्रीमती श्रद्धा ढवण यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते श्रीमती ढवण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लाल कंधारी व देवणी गट पशु पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण

 सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण

विदर्भ मराठवाडा दुग्धोत्पादन प्रकल्प आणि पशुधन विकास महामंडळ नागपूर यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण यावेळी करण्यात आले. पशुधन विकास मंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शितल मुकणे आणि मुख्य शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोमनाथ माने त्यासोबतच डॉ. दिनकर बोर्डे उपायुक्त पशुसंवर्धन जिल्हा परिषद सातारा व विदर्भ मराठवाडा उत्पादन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गोराडे यांना यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते कराराच्या प्रति हस्तांतरित करण्यात आल्या.

विजेत्यांचा गौरव

 विजेत्यांचा गौरव

अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी पालन योजनेतील विजेत्यांना आणि गोपाळ रत्न पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पशुसंवर्धन विभागाच्या 'महापशुधन वार्ताया मासिकाच्या 10व्या अंकाचे प्रकाशन व विभागाच्या 'दिनदर्शिका 2026'चे अनावरण केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी  महापशुधन एक्स्पो 2026मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पात्र महिला बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वितरण केले. जिरेवाडीता. परळी येथील तुळजाई महिला स्वयंसहायता समूहास ₹15,00,000 इतक्या कर्जाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)च्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत बर्दापूर येथील उमेद सखी – महिला शेतकरी उत्पादक कंपनीला शासन अनुदानाच्या ₹12,27,500 या प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले.

गावातला तरुण होईल 'पशुधन उद्योजक'

 गावातला तरुण होईल 'पशुधन उद्योजक': पंकजा मुंडे

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, "केवळ नोकरीच्या मागे न लागता गावातील तरुणांनी मालक बनावेयासाठी आम्ही लवकरच 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनाआणत आहोत. महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी शासनाकडून शून्य टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून देत आहे." तसेच पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. हा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मंत्री मुंडे यांनी आभार मानले.

माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी बीड व परळीच्याश्र विकासासाठी कायम निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार मानले.

*हृदयपरीवर्तनी महाशिवरात्रीची*

 🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

    *हृदयपरीवर्तनी महाशिवरात्रीची* 

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🚩🔱🚩🔆🙏🔆🚩🔱🚩  

  

        *ॐ त्र्यम्बकं यजामहे*

        *सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।*

        *उर्वारुकमिव*

        *बन्धनान्मृत्योर्मुक्षीय*

        *मामृतात् ॥*


        *आज महाशिवरात्र. महाराष्ट्रात तर महाशिवरात्रीचा उत्साह आगळा. इथे गावॊगाव शिवमंदिर आहेत.. यात्रा भरल्यात. इथे त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ अशी पाच ज्योतिर्लिंग आहेत. छत्रपती शिवरायांनी शिवाचे आशीर्वाद घेत हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा केली होती जी पूर्ण केली.*

        *शिवोहम.. म्हणजे मीच सतचित आनंद.. प्रकाश स्वरुप 'शिव' आहे. तोच कृपाभाव, त्यागीवृत्ती, परमोच्च ज्ञान मला आहे. 'मी' आणि 'तो' एकच आहे. सृष्टीतील आदि शिवाप्रमाणेच मी पण समोरच्यामध्ये स्वतःला बघतो. तीच ज्योत माझ्यात आहे. तोच पवित्र 'शिव' भाव.. प्रेमभाव, समर्पणवृत्ती माझ्यात आहे.*    

        *आज हाच शिवभाव प्राप्त करण्यासाठी भक्त शिवाला शरण जाणार. ब्रह्मा.. विष्णू आणि महेश या जगाच्या त्रिमुर्तीपैकी सृष्टीचक्र सुरु ठेवण्यासाठी शिवाची ओळख संहारक देवता म्हणून आहे. सृष्टीसाठी ते आवश्यक..सत्य आहे. म्हणूनही शिव सत्य आहेत. त्यांच्या जवळ देव-दानव फरकच नाही. जो भक्ती करेल त्या भक्ताला मागेल तो वर देणारे.*

        *मनुष्याप्रमाणे प्राण्यांना जगायला स्वत:साठी अन्न पिकवता येत नाही. 'जीवो जीवस्य जीवनम्' हा सृष्टीनियम झाला. पण प्रत्येकाला कुटुंब प्रेम.. समाज.. देश प्रेम आहेच. अगदी प्राण्यामध्येही कुटुंब प्रेम आहेच. एकदा एका उपाशी पारध्याच्या हाती हरिणी सावज आले. मला एकदा कर्तव्यपालनासाठी घरी जावू द्या अशी हरिणीने विनंती करून परत येण्याचे वचन पारध्यास दिले.*

        *या पारध्याने त्या हरिणीवर बाण चालवला नाही. तिच्या पिल्लांना भेटण्यासाठी.. स्वतः उपाशी राहून हरिणीला जावू दिले. रात्रभर तो पारधी हरिणीची वाट बघत झाडावर बसला. रात्रभर त्या झाडाची पाने खाली फेकत होता. पहाटे ती हरणीच काय तर तिचे सारे कुटुंब दिलेल्या शब्दाप्रमाणे मरण स्वीकारायला समोर उभे राहिले.*

        *हरिणीच्या कुटुंबातील सारेच सदस्य "'तू मला मार या हरिणीचा जीव वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे" असे म्हणू लागले. या कुटुंबाचे हे एकमेकांवरचे प्रेम.. त्यागवृत्ती बघून तो पारधी थक्क झाला. त्यांचे हृदयपरिवर्तन झाले. त्याने सर्वानाच जीवदान दिले. नकळत होणारी सत्कर्म.. पूजाही जीवनात उपयोगी पडतात. पारधी ज्या झाडाची पाने फेकत होता ते झाड होते बेलाचे. पाने खाली पडत होती ती शिवलिंगावर.*

        *हरिणी.. तिचे कुटुंबिय, पारधी या प्रत्येकाचा समर्पण भाव बघून तिथे शंकर।प्रकटले. त्यांनी मायाळू पारधी आणि सावज हरिणी या दोघांवरही कृपा करुन त्यांना 'मृग' व 'व्याघ्र' अशी दोन नक्षत्रे म्हणून नभोमंडळी विराजमान केले. पारध्याच्या हृदय परिवर्तनाची ही किमया घडली महाशिवरात्रीला.*

        *शिव म्हणजे कल्याण करणारे. सर्वांचे कल्याण व्हावे, शिवोहम व्हावे यासाठी आजचे व्रत. आजच्याच दिवशी शिवपार्वती विवाह झाला होता.*

        *निळकंठ.. भोळ्या शंकराचे एक नाव. जगात सदैव चांगले.. वाईट.. सत्प्रवृत्ती.. दुष्प्रवृत्ती. तसेच विष.. अमृत हे दोन्ही राहणारच. पण अमृत पिऊन अमर होण्याची प्रत्येकाची धडपड असते. पण विष मात्र कुणालाच नको असते. पण हे विष सुद्धा कुणाला तरी घ्यावेच लागेल. पण घेणार कोण ? मग अमृत मंथनातील हे विष घेतले ते भोळ्या शंकरांनी. त्या जहाल विषाने त्यांचा कंठ निळा झाला. दाह तर एवढा झाला की त्या दाहाच्या थयथयाटाने तांडव नृत्य घडले.*

        *जीवनातील विष अर्थातच भक्ताच्या मनातील काम.. क्रोध.. लोभ.. मोह.. मद.. मत्सर हे सारे षड्रिपू भाव. हे विष गळ्यातच ठेवा. पोटातही नको अन् मुखातून उच्चारही नको. अन्यथा युद्ध अटळच. हा संदेश देणारे हे भोलेनाथ. सर्वसत्ताधीश असूनही.. संहाराची शक्ती असूनही, कुठलाही सत्ता, संपत्ती, ऐषाराम याचा मोह त्यांना नाही. साधे जीवन जगण्याचा संदेश देणारे हे देवांचेही देव महादेव.*

        *"शिवो भूत्वा शिवं यजेत" अर्थात शिव भाव ठेवत आज शिवाचे पूजन होणार. विष कंठात धारण केल्याने शिवाच्या शरीरात दाह निर्माण झाला. त्यामुळे शिव रात्रभर जागे होते. त्यांच्या सोबत सारेच देवदेवताही जागे राहून त्यांची स्तुती करत होते. यामुळे भक्तही आज रात्रभर भक्तीजागरण करणार. आज जे त्याने दिले तेच जल.. दुध.. बेल पाने अंशरुपात त्याला वाहायचे. उपवास आणि संकीर्तनाने रात्र जागवायची.*

        *हे ज्ञान गंगा धारण.. ज्ञान वाटणारे भोलेनाथ म्हणजे भोळ्या.. सरळ लोकांचे नाथ अर्थात रक्षणकर्ते, म्हणून जे अन्यायी.. दुराचारीं आहेत त्यांच्यावर शिवाचे त्रिशूळ चालते.*

        *आज देशभर शिवलीलामृत.. काशीखंड आदिंचे वाचन होत.. 'ॐ नमः शिवाय' चा जप होतो. आज देशविदेशी शिवभक्तीचा हा आनंदोत्सव साजरा होणार.*

           *!! ॐ नमः शिवाय !!*


🔱🍁☘🍁🔱🍁☘🍁🔱

  1️⃣

  *सर्वात्मका सर्वेश्वरा*

  *गंगाधरा शिवसुंदरा*

  *जे जे जगी जगते तया*

  *माझे म्हणा करुणाकरा*


  *आदित्य या तिमिरात व्हा*

  *ऋग्वेद या हृदयात व्हा*

  *सुजनत्व द्या, द्या आर्यता*

  *अनुदारिता दुरिता हरा*


  *गीत : कुसुमाग्रज*  ✍️

  *संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी*

  *स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी*  

  *नाटक : ययाति आणि देवयानी*


🔱☘🌼🌸🙏🌸🌼☘🔱

  2️⃣

  *शिव तांडव स्तोत्र :*

  *जटाटवीगलज्जल*

  *प्रवाहपावितस्थले..*


  *रचना : लंकाधिपती रावण*  ✍️

  *स्वर : शंकर महादेवन*  


  🎼🎶🎼🎶🎼    🎧


        🚩  *ॐ नमः शिवाय* 🚩


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *१५.०२.२०२६*


🌻🌸🔱☘🌼☘🔱🌸🌻

Featured post

Lakshvedhi