Wednesday, 11 February 2026

संविधानातील दहावी सूची अधिक प्रभावी करण्यासाठी समितीमार्फत शिफारशी करणार -

 संविधानातील दहाव्या सूचीतील तरतुदी अधिक स्पष्ट व प्रभावी करण्यासाठी गठित समितीची पहिली बैठक मुंबईत संपन्न

संविधानातील दहावी सूची अधिक प्रभावी करण्यासाठी

 समितीमार्फत शिफारशी करणार

-         विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

 

मुंबई दि.१०:   संविधानातील दहावी सूची अधिक प्रभावीस्पष्ट आणि सुसंगत करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झाली. या समितीमार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ग्रामीण व शहरी भागातील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार

 उच्चस्तरीय सचिव समितीने प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार असूनआधुनिक वास्तुशास्त्रीय मानकांनुसार संकुलाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण व शहरी भागातील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार असूनक्रीडा क्षेत्रात बारामती तालुका राज्यात नवे आदर्श प्रस्थापित करेल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नातील क्रीडा संकुल प्रत्यक्षात साकार होत असूनत्यांच्या दूरदृष्टीला हीच खरी आदरांजली ठरणार आहे.


बारामती तालुक्यातील कटफळ येथील ८० हजार चौ.मी. क्षेत्रावर हे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारले जाणार

 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राप्त झालेल्या बारामती तालुक्यातील कटफळ येथील ८० हजार चौ.मी. क्षेत्रावर हे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारले जाणार असून, यामुळे पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंक, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान यासह विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. राज्याच्या क्रीडा धोरणानुसार जिल्हा पातळीवर क्रीडा संकुल उभारणीचा संकल्प दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पुढे नेला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बारामती येथे टप्पा-१ व टप्पा-२ अंतर्गत क्रीडा सुविधा उभारल्या गेल्या असून, आता टप्पा-३ मुळे या संकुलाचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात होणार आहे.

बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी § दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार

 बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी

§  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारुन पहिल्याच दिवशी अजितदादांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकले दमदार पाऊल

 

मुंबईदि. १० :- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुल (टप्पा-३) अंतर्गत अतिरिक्त इमारत बांधकामे व विविध आधुनिक क्रीडा सुविधा उभारणीसाठी ७५.१३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंत्रिमंडळाने कार्योत्तर मान्यता दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मार्गी लावून घेत अजितदादांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. 

अधिवेशन काळात शनिवार २८ फेब्रुवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार

 राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्रीराज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही  बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

अधिवेशन काळात शनिवार २८ फेब्रुवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे. सोमवार दि. २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही१९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुटी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच २० मार्च रोजीही विधिमंडळ कामकाज होणार नाही.

 संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६  हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा करण्यात येणार आहे.

 जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा होणार आहे.

 मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार आहे

निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

 राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून

अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

 

मुंबईदि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहेअसा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात  आला.

 

विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारविधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेउच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटीलमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारआमदार सर्वश्री अनिल परबप्रसाद लाडभास्कर जाधवजयंत पाटीलसुनील प्रभुभाई जगताप, प्रवीण दरेकरविक्रम काळेसतेज पाटीलविधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे  व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपलब्ध निधीचा शंभर टक्के वापर करून सर्व प्रलंबित विकासकामे

 आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात विभागाकडील उपलब्ध निधीचा शंभर टक्के वापर करून सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करावीत. राज्याच्या किनारपट्टीचा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिकतेसाठी आगामी काळात अधिक निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी यावेळी दिले.

            या  बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  पी. प्रदीपपदुम (पशुसंवर्धनदुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय) विभागाचे सचिव  एन. रामास्वामीमत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi