Wednesday, 11 February 2026

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

 राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून

अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

 

मुंबईदि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहेअसा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात  आला.

 

विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारविधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेउच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटीलमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारआमदार सर्वश्री अनिल परबप्रसाद लाडभास्कर जाधवजयंत पाटीलसुनील प्रभुभाई जगताप, प्रवीण दरेकरविक्रम काळेसतेज पाटीलविधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे  व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi