Wednesday, 11 February 2026

अधिवेशन काळात शनिवार २८ फेब्रुवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार

 राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्रीराज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही  बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

अधिवेशन काळात शनिवार २८ फेब्रुवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे. सोमवार दि. २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही१९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुटी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच २० मार्च रोजीही विधिमंडळ कामकाज होणार नाही.

 संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६  हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा करण्यात येणार आहे.

 जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा होणार आहे.

 मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार आहे

निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi