Wednesday, 4 February 2026

महाराष्ट्रासाठी काय?

 महाराष्ट्रासाठी काय?

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प : 378.38 कोटी

महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्प : 167.28 कोटी

सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 283.77 कोटी

महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम : 385.78 कोटी

उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण : 207.10 कोटी

शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : 646.24 कोटी

मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाईड नॉलेज प्रकल्प : 313.65 कोटी

जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमतावृद्धीसाठी : 240.90 कोटी

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर : 6103 कोटी

मुंबई मेट्रो : 1702 कोटी

एमयुटीपी 3 : 462 कोटी

एमएमआरमध्ये ग्रीन मोबिलिटी : 155.32 कोटी

समृद्धी महामार्गावर आयटीएस : 680.79 कोटी

पुणे मेट्रो : 517.74 कोटी

(ही केवळ मुंबईपुण्यातील प्राथमिक आकडेवारी आहे. एकूण : 12,355 कोटी)

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल

 महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!

विकसित भारताकडे दमदार पाऊल


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 1:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.


केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना माध्यमांशी ते बोलत होते. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे, पूर्वी जी केवळ 1 लाख कोटी असायची. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील विकासाचा विचार करुन शहरीकरणाच्या एकात्मिक विचार करण्यात आला आहे. यातून विविध क्षेत्रांना दिशा, गती आणि निधी प्राप्त होणार आहे. याचा मोठा लाभ महाराष्ट्राला होणार आहे. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. पुणे-हैदराबाद कॉरिडॉरचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. ग्रोथहबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबला होणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Conservation of Natural Oil and Gas is Service to the Nation

 Conservation of Natural Oil and Gas is Service to the Nation

Minister Mangal Prabhat Lodha

 

‘SAKSHAM 202526’ campaign launched from today to promote energy conservation

 

Mumbai, Feb 2: Conserving natural oil and gas is a service to the nation. Fuel conservation is a key objective envisioned by Prime Minister Narendra Modi under the goal of Viksit Bharat 2047, and with the participation of every citizen, the country will achieve this goal. Conserving oil and gas means adopting green energy, and participation in this initiative is a social responsibility of every individual, appealed Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation, Mangal Prabhat Lodha.

 

Under the guidance of the Union Ministry of Petroleum and Natural Gas and with the cooperation of the State Government, various public awareness activities are being organized by state-level coordinators of the oil industry at Ravindra Natya Mandir, Prabhadevi. As part of this, the ‘Saksham 202526 (Fuel Conservation Capacity Festival)’ was inaugurated under the chairmanship of Minister Mangal Prabhat Lodha, who was speaking on the occasion.

सक्षम अभियानाच्या पंधरवड्यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा व वादविवाद, महाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र

 सक्षम अभियानाच्या पंधरवड्यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा व वादविवादमहाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र व ग्राफिटी स्पर्धाइंधन-कार्यक्षम वाहनचालक स्पर्धालेखन स्पर्धादूरदर्शन व रेडिओवरील चर्चासत्रांचे आयोजन. या अभियाना दरम्यान शालेय विद्यार्थीयुवकएलपीजी वापरकर्तेवाहनचालकउद्योग क्षेत्रातील कर्मचारीशेतकरीगृहनिर्माण संस्थाग्रामपंचायती व स्वयंसेवी संस्था यांच्यापर्यंत पोहोचून इंधन संवर्धनाचे महत्त्वफायदे आणि उपाय योजनांबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. इंधन-कार्यक्षम तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी  दिली.

राज्यात संरक्षण क्षमता महोत्सव राबविणार

 राज्यात संरक्षण क्षमता महोत्सव राबविणार - उमेश कुलकर्णी

        राज्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी म्हणाले कीभारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितताशाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ या राष्ट्रीय अभियानाची आजपासून देशभरात सुरुवात होत आहे. १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत Conserve Oil & Gas, Go Green (तेल आणि गॅस वाचवाहरित ऊर्जा स्वीकारा) या घोषवाक्यासह हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि संबंधित राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

संरक्षण समता महोत्सव अभियानाचा उद्देश जीवाश्म इंधनांचा अपव्यय कमी करणे, परकीय चलनावरील

 मंत्री लोढा म्हणाले की, राज्य तेल व समन्वय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संरक्षण समता महोत्सव अभियानाचा उद्देश जीवाश्म इंधनांचा अपव्यय कमी करणेपरकीय चलनावरील वाढता भार रोखणे तसेच हरितगृह वायूंमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान कमी करणे हा आहे. आज जगभरात ऊर्जेला सर्वाधिक मागणी आहे. जागतिक स्तरावरील राजकारण तेलाभोवती एकवटले आहे. इंधनाची बचत करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला हातभार लावणे असे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करून आपण तेल बचत करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात हरित उर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. शालेय जीवनामध्ये तेल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिल्यास भविष्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रत्येक घटकाचा तेल बचतीमधील खारीचा वाटा हा देशाच्या प्रगतीला हातभार लागू शकतो असे मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले.

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा

 नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा  

-मंत्री मंगलप्रभात लोढा

·         ऊर्जा संवर्धनासाठी सक्षम २०२५-२६’ अभियानाची आजपासून सुरुवात

          मुंबई, दि. २ : नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७  च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश हे ध्येय साध्य करेल. तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे हरित ऊर्जेचा अंगीकार करणे हा आपल्या प्रत्येकाच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

         प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत 'संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६चा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

Featured post

Lakshvedhi