मंत्री लोढा म्हणाले की, राज्य तेल व समन्वय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संरक्षण समता महोत्सव अभियानाचा उद्देश जीवाश्म इंधनांचा अपव्यय कमी करणे, परकीय चलनावरील वाढता भार रोखणे तसेच हरितगृह वायूंमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान कमी करणे हा आहे. आज जगभरात ऊर्जेला सर्वाधिक मागणी आहे. जागतिक स्तरावरील राजकारण तेलाभोवती एकवटले आहे. इंधनाची बचत करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला हातभार लावणे असे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करून आपण तेल बचत करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात हरित उर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. शालेय जीवनामध्ये तेल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिल्यास भविष्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रत्येक घटकाचा तेल बचतीमधील खारीचा वाटा हा देशाच्या प्रगतीला हातभार लागू शकतो असे मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment