Wednesday, 4 February 2026

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा

 नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा  

-मंत्री मंगलप्रभात लोढा

·         ऊर्जा संवर्धनासाठी सक्षम २०२५-२६’ अभियानाची आजपासून सुरुवात

          मुंबई, दि. २ : नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७  च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश हे ध्येय साध्य करेल. तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे हरित ऊर्जेचा अंगीकार करणे हा आपल्या प्रत्येकाच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

         प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत 'संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६चा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi