Sunday, 1 February 2026

दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार,

 दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी३७ लाख कोटींचे सामंजस्य करार,

४३ लाख रोजगारनिर्मिती

– उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत

मुंबईदि. २३ : दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असूनत्यातून राज्यात ४३ लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी ठरलेला आहेअशी माहिती उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

उद्योगमंत्री डॉ.सामंत म्हणाले कीदावोसमध्ये एकूण ८१ करार झाले असूनत्यापैकी १६.६९ लाख कोटी रुपयांचे ५१ करार उद्योग क्षेत्रातील आहेत. एमएमआरडीए’ अंतर्गत २४ करार असून त्यांची किंमत १९.४३ लाख कोटी रुपये आहेतर सिडको अंतर्गत ६ करार १.१५ लाख कोटी रुपयांचे आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी सरासरी ८० टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहेअसे त्यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षी दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये १५ लाख कोटींच्या सामंजस्य कराराची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी सुरू आहे. गडचिरोलीछत्रपती संभाजीनगररत्नागिरीरायगड आदी जिल्ह्यांत प्रत्यक्ष उद्योग उभे राहत असल्याचे उद्योग मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.


भारत पर्व ' महोत्सवामध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाने सहभाग घेऊन राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांची

 पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की, ‘भारत पर्व महोत्सवामध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाने सहभाग घेऊन राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांची माहिती पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या भागधारकांद्वारे पर्यटन सेवा-सुविधांची माहिती देण्यात आली. यामुळे विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पर्यटन वाढीसाठी मदत मिळेल. तसेच सदर महोत्सवाच्या माध्यामातून महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन क्षेत्रातील आपली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्थरावर पोहोचविण्याचा

 पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय  खंदारे म्हणाले की, ‘भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्थरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. राज्यातील गड-किल्लेसांस्कृतिक वारसासमुद्रकिनारेथंड हवेची ठिकाणे आदी पर्यटनविषयक वैशिष्ट्ये असलेल्या स्थळांची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी विशेष फायदा झाला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटनाबाबत जाणून घेण्यास अधिक रुची दाखविली. याचा पर्यटन क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या नक्कीच फायदा होईल.

सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, युनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत

 सांस्कृतिक वारसासमुद्रकिनारेयुनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगभरात पोहोचविणे हा या दालनामागचा मुख्य उद्देश होता.

विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारक तसेच अनेक पर्यटकांनी पर्यटन विभागाच्या दालनाला भेट दिली. पर्यटन क्षेत्रातील विविध स्तरांमधील घटकांनी महाराष्ट्र पर्यटन आणि सेवांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यात रुची दाखविली. दालनाच्या सर्जनशील सादरीकरणाबाबत तसेच महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व विविध पर्यटन क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेकांनी कौतुक केले.

Saturday, 31 January 2026

या महोत्सवामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधता, खाद्यपदार्थ, पोशाख, हस्तकला, लोककला आणि संगीताचे अनोखे दर्शन

 या महोत्सवामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधताखाद्यपदार्थपोशाखहस्तकलालोककला आणि संगीताचे अनोखे दर्शन घडले. विविधतेमध्ये एकता असल्याचा संदेश या महोत्सवामधून देण्यात आला. भारत पर्व 2026मध्ये पर्यटन विभागाच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्रपर्यटन स्थळी जाण्याची सोयउपलब्ध सोयी-सुविधा इत्यादी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.

सांस्कृतिक वारसासमुद्रकिनारेयुनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगभरात पोहोचविणे हा या दालनामागचा मुख्य उद्देश होता.

भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला

 ‘भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा

जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला

- पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई

 

  • भारत पर्व 2026’ महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचा सहभाग
  • ‘भारत पर्व 2026मध्ये महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

 

मुंबईदि.31 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यासमोरील लॉन्स व ग्यानपथनवी दिल्ली येथे 26 ते 31 जानेवारी दरम्यान भारत पर्व 2026’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सहा दिवसीय महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दालन उभारुन सहभाग घेतला होता. ‘भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असे मत पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी मांडले. महोत्सवामधील पर्यटन विभागाच्या दालनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

विस्तारित अर्थव्यवस्थेनुसार तंत्रज्ञानातील बदलांशी अनुरूप आपली यंत्रणा प्रशिक्षित

   विस्तारित अर्थव्यवस्थेनुसार तंत्रज्ञानातील बदलांशी अनुरूप आपली यंत्रणा प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. पिटिशन ड्राफ्टिंगसाठी एआयचा उपयोग करताना होणाऱ्या धोक्यांबाबतही सतर्क राहायला हवे. संशोधनाशिवाय गुणवत्ता येत नाहीत्यामुळे हे रिसर्च सेंटर भविष्यात दर्जेदार कायदेविषयक संशोधनाचे केंद्र बनेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

Featured post

Lakshvedhi