या महोत्सवामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधता, खाद्यपदार्थ, पोशाख, हस्तकला, लोककला आणि संगीताचे अनोखे दर्शन घडले. विविधतेमध्ये एकता असल्याचा संदेश या महोत्सवामधून देण्यात आला. ‘भारत पर्व 2026’मध्ये पर्यटन विभागाच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, पर्यटन स्थळी जाण्याची सोय, उपलब्ध सोयी-सुविधा इत्यादी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.
सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, युनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगभरात पोहोचविणे हा या दालनामागचा मुख्य उद्देश होता.
No comments:
Post a Comment