‘भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा
जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला
- पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई
- ‘भारत पर्व 2026’ महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचा सहभाग
- ‘भारत पर्व 2026’मध्ये महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि.31 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यासमोरील लॉन्स व ग्यानपथ, नवी दिल्ली येथे 26 ते 31 जानेवारी दरम्यान ‘भारत पर्व 2026’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सहा दिवसीय महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दालन उभारुन सहभाग घेतला होता. ‘भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असे मत पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी मांडले. महोत्सवामधील पर्यटन विभागाच्या दालनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
No comments:
Post a Comment