Thursday, 29 January 2026

देशातील पहिल्या रजोनिवृत्ती क्लिनिक्सची महाराष्ट्रात सुरुवात

 देशातील पहिल्या रजोनिवृत्ती क्लिनिक्सची महाराष्ट्रात सुरुवात

- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श

 

मुंबईदि. २७ : महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या दूरदर्शी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती  क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला राज्यभरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक व संवेदनशील टप्पा असूनया काळात शारीरिकभावनिक व हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणावर जाणवतात. हार्मोनल असंतुलनहाडांचे विकारझोपेच्या तक्रारीहृदयविकाराचा धोका तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या बाबींकडे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत विशेष लक्ष देवून शासनाने रजोनिवृत्ती-केंद्रित आरोग्य सेवांना संस्थात्मक स्वरूप देत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

या रजोनिवृत्ती क्लिनिक्समध्ये महिलांसाठी एकाच छताखाली सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत असूनत्यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हार्मोनलहाडे व हृदयाच्या आरोग्याची तपासणी, आवश्यक उपचारऔषधे तसेच जीवनशैलीविषयक मार्गदर्शन यांचा समावेश आहे.

या सेवांचा लाभ घेतलेल्या महिलांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली असूनहा उपक्रम आवश्यकसन्मानजनक आणि महिलांना सक्षम करणारा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके.

 पायाभूत प्रकल्पांविषयी...

·         छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता.

·         मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटरभूमिगत मार्ग 9.25 किलोमीटरउन्नत मार्ग 24.636 किमीएकूण 20 स्थानके6 स्थानके भूमिगत14 स्थानके उन्नत.  

·         छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके.

·          गोवंडी (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकापर्यंत उन्नत स्थानकेदोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर.

·         30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकताभूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मितीमार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटरया प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटीच्या खर्चास मान्यता. या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50 टक्के भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय.

 

गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे - कोनसरी - मूळचेरा - हेदरी - सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीस मान्यताचार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा महामार्ग.

0000

प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य आणि

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत कामे रेंगाळू नये,  काम पूर्ण होण्यास विलंब लागल्यास प्रकल्पाच्या खर्चामध्ये वाढ होते. नागपूर ते गोंदियाभंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती द्यावी.  प्रकल्प कार्यादेश देतानाच प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याची अट करण्यात यावी.

प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य आणि विहित कालावधीपेक्षा  जास्त वेळ लागल्यास दंडाची व्यवस्था असलेली ऑटो मोडवरील यंत्रणा विकसित करावी. गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गाचे काम करीत असताना रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी जागेची उपलब्धता असल्याची खात्री करावी. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून जागेची तरतूद महामार्गाच्या बाजूला करण्यात यावीअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवालअपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्तामहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाडमहाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) मनीषा म्हैसकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादरीकरण केले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो जोडणीस मान्यता · भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी

 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई

आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो जोडणीस मान्यता

·         भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी

सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता

 

मुंबईदि. २७: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.

पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही  प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील  तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन · 1 हजाराहून अधिक पशूंचे

 परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

·         1 हजाराहून अधिक पशूंचे प्रदर्शनपशुसंवर्धन विभागामार्फत नियोजनास वेग

 

मुंबईदि. 27 : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचेआयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातीच्या एक हजाराहून अधिक पशू प्रदर्शन होणार असून प्रदर्शनाची तयारी वेगात सुरू आहे.

 

या प्रदर्शनात पशुपालकांना गायीम्हशीघोडेशेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळतील. केवळ महाराष्ट्रच नव्हेतर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालनआहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहेअशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

 

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन.  यांच्या मार्गदर्शनाखाली  या प्रदर्शनाचे नियोजन प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. "या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपालकांना पशुसंवर्धनाविषयीची संकीर्ण व अद्ययावत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. याचा फायदा पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी होईल," असा विश्वास पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी व्यक्त केला.

 

नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र,घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स' कथासंग्रहाचे प्रकाशन

 ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र

-         राज्यपाल आचार्य देवव्रत

''घोस्ट्सहॉरर अँड हिल्सकथासंग्रहाचे प्रकाशन

 

मुंबईदि. 27 : समाजमाध्यमे प्रभावी असली तरीहीग्रंथ हे माणसाचे सच्चे मित्र असून ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून शांती व आंतरिक खंबीरता लाभतेअसे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते  'घोस्ट्सहॉरर अँड हिल्सया कथासंग्रहाचे प्रकाशन लोकभवन येथे करण्यात आले. 'हाय ऑन कसोलया पुस्तकाचे लेखकपत्रकार व अध्यापक आदित्य कांत हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

            पुस्तकाचे नाव जरी गुढ व भयप्रद वाटत असले तरी पुस्तकातील 18 कथांच्या माध्यमातून लेखकाने सामाजिक कार्य व सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. लेखकाने या लोककथांचा उपयोग करून हृदयस्पर्शी कथा लिहिल्या असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            संवेदनशीलता ही मानवाची सर्वात मोठी ओळख असून साहित्याच्या माध्यमातून युवकांमध्ये संवेदनशीलतेची भावना वृद्धिंगत झाली तर त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन होईलअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

            कोरोना काळात जीवन मरणाशी लढताना तशाही स्थितीत कोरोना रुग्णांना मदत करण्याची आंतरिक इच्छा होती अशी भावना लेखक आदित्य कांत यांनी यावेळी सांगितले.

            पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या व्यवसाय व्यवस्थापिका करुणा बडवालसंगीतकार संजीव वाधवानी व चित्रपट निर्माते राजन खोसा यासह मनोरंजन व माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध शैक्षणिक लाभ दिले जात आहेत. शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती

 यावेळी जलसंपदा मंत्री श्री. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणालेउपसमिती तसेच माजी न्यायमूर्ती  संभाजी शिंदे यांनी दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून जात दाखले व वैधता प्रमाणपत्र वितरणातील अडथळे दूर करावेत. मराठा कुणबी जात दाखले व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश दिले असूनहैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावीजिल्हा प्रशासनामार्फत सुरू असलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा विभागीय आयुक्तांनी घ्यावा,असेही त्यांनी सांगितले.

दाखले वितरणाचा वेग वाढविण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे यांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती उपयुक्त ठरणार असूनते मराठवाडा विभागातील विविध जिल्ह्यांना भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. सप्टेंबर २०२५ नंतर प्राप्त अर्ज व वितरित दाखल्यांचे प्रमाण सध्या कमी असूनते वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सूचित केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले कीमराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध शैक्षणिक लाभ दिले जात आहेत. शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती आदींसाठी ओबीसी विभागवैद्यकीय शिक्षण व कृषी विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करण्यात यावी. या दृष्टीने बैठकीचे आयोजन करावे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मराठा कुणबी उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र अर्जांवर तातडीने कार्यवाही करताना प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत सचिव गणेश पाटील तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जात प्रमाणपत्र वितरणाची सद्यस्थिती सादर केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रहिवासी पुरावेवंशावळ व १९६७ पूर्वीच्या पुराव्यांच्या आधारे करण्यात येत असलेल्या नियमानुसार कार्यवाहीची माहिती दिली.

Featured post

Lakshvedhi