ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र
- राज्यपाल आचार्य देवव्रत
''घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स' कथासंग्रहाचे प्रकाशन
मुंबई, दि. 27 : समाजमाध्यमे प्रभावी असली तरीही, ग्रंथ हे माणसाचे सच्चे मित्र असून ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून शांती व आंतरिक खंबीरता लाभते, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते 'घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स' या कथासंग्रहाचे प्रकाशन लोकभवन येथे करण्यात आले. 'हाय ऑन कसोल' या पुस्तकाचे लेखक, पत्रकार व अध्यापक आदित्य कांत हे या पुस्तकाचे लेखक आहेत.
पुस्तकाचे नाव जरी गुढ व भयप्रद वाटत असले तरी पुस्तकातील 18 कथांच्या माध्यमातून लेखकाने सामाजिक कार्य व सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. लेखकाने या लोककथांचा उपयोग करून हृदयस्पर्शी कथा लिहिल्या असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
संवेदनशीलता ही मानवाची सर्वात मोठी ओळख असून साहित्याच्या माध्यमातून युवकांमध्ये संवेदनशीलतेची भावना वृद्धिंगत झाली तर त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन होईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
कोरोना काळात जीवन मरणाशी लढताना तशाही स्थितीत कोरोना रुग्णांना मदत करण्याची आंतरिक इच्छा होती अशी भावना लेखक आदित्य कांत यांनी यावेळी सांगितले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या व्यवसाय व्यवस्थापिका करुणा बडवाल, संगीतकार संजीव वाधवानी व चित्रपट निर्माते राजन खोसा यासह मनोरंजन व माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment