Wednesday, 28 January 2026

विशेष बाब म्हणजे, राज्यव्यापी व संघटित स्वरूपात रजोनिवृत्ती काळजी कार्यक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील

 विशेष बाब म्हणजेराज्यव्यापी व संघटित स्वरूपात रजोनिवृत्ती काळजी कार्यक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असूनत्यामुळे इतर राज्यांसाठी  हा एक राष्ट्रीय आदर्श निर्माण झाला आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असूनमहिलांसाठी ही एक अर्थपूर्ण व आरोग्यकेंद्रित भेट ठरली आहे.

राज्याच्या विविध भागांतील महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले असूनमहिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत शासनाची संवेदनशीलता व सर्वसमावेशक सार्वजनिक आरोग्यसेवेप्रती असलेली बांधिलकी याचे हे उत्तम उदाहरण आहे.

रजोनिवृत्ती हा आजार नसून स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला या टप्प्यात सन्मानपूर्वकयोग्य वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार मिळावेतयासाठीच रजोनिवृत्ती क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. महिलांचे आरोग्य सक्षम झालेतर कुटुंबसमाज आणि राज्य अधिक सक्षम होईल. असे राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी सांगितले.

हा उपक्रम सार्वजनिक आरोग्याबाबतच्या ठोस दृष्टीकोनाचे प्रतिबिंब असूनभारतात महिला-केंद्रित आरोग्यसेवेच्या दिशेने परिवर्तनकारी पाऊल म्हणून त्याचे व्यापक कौतुक होत आहे.

देशातील पहिल्या रजोनिवृत्ती क्लिनिक्सची महाराष्ट्रात सुरुवात

 देशातील पहिल्या रजोनिवृत्ती क्लिनिक्सची महाराष्ट्रात सुरुवात

- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श

 

मुंबईदि. २७ : महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या दूरदर्शी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती  क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला राज्यभरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक व संवेदनशील टप्पा असूनया काळात शारीरिकभावनिक व हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणावर जाणवतात. हार्मोनल असंतुलनहाडांचे विकारझोपेच्या तक्रारीहृदयविकाराचा धोका तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या बाबींकडे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत विशेष लक्ष देवून शासनाने रजोनिवृत्ती-केंद्रित आरोग्य सेवांना संस्थात्मक स्वरूप देत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

या रजोनिवृत्ती क्लिनिक्समध्ये महिलांसाठी एकाच छताखाली सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत असूनत्यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हार्मोनलहाडे व हृदयाच्या आरोग्याची तपासणी, आवश्यक उपचारऔषधे तसेच जीवनशैलीविषयक मार्गदर्शन यांचा समावेश आहे.

या सेवांचा लाभ घेतलेल्या महिलांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली असूनहा उपक्रम आवश्यकसन्मानजनक आणि महिलांना सक्षम करणारा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

विशेष बाब म्हणजेराज्यव्यापी व संघटित स्वरूपात रजोनिवृत्ती काळजी कार्यक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असूनत्यामुळे इतर राज्यांसाठी  हा एक राष्ट्रीय आदर्श निर्माण झाला आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असूनमहिलांसाठी ही एक अर्थपूर्ण व आरोग्यकेंद्रित भेट ठरली आहे.

मराठी सतत विकसित होणारी समृद्ध भाषा

 मराठी सतत विकसित होणारी समृद्ध भाषा

-सचिव डॉ. किरण कुलकर्णी

 

·         मंत्रालयात मराठी भाषा अधिकाऱ्यांची कार्यशाळा

 

मुंबई, दि. 27 :- यंदाच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची मुख्य संकल्पना ‘जागर बोली भाषांचा’  ही आहे. मराठी भाषेमध्ये २१६ बोली भाषा आणि ३५ परकीय भाषांतील शब्द रूढ झाले असूनयामुळे मराठी ही सतत विकसित आणि समृद्ध होत जाणारी भाषा ठरत असल्याचे प्रतिपादन मत मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मंत्रालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत पदनिर्देशित सर्व मराठी भाषा अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठी भाषा संचालनालयाचे संचालक अरूण गीतेवित्त विभागाचे सहसचिव शिंदे व पदनिर्देशित मराठी भाषा अधिकारी उपस्थित होते.

राजभाषा म्हणजे अवघड संकल्पना नाही. शासन निर्णय आणि परिपत्रक सामान्य नागरिकांना समजतील अशा सोप्या भाषेत असावेतहाच खरा राजभाषेचा आत्मा आहे. या कार्यशाळेतून राज्यातील दोन-अडीच लाख मराठी भाषा अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत दर महिन्याला ऑनलाईन मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषेबाबत जाणीवजागृती नवी लाट निर्माण होईलअशी  अपेक्षा श्री कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

संचालक गीते यांनी महाराष्ट्र राजभाषा अधिनियम१९६४ मधील विविध तरतुदींचे सविस्तर सादरीकरण केले. तसेच मराठी भाषा अधिकारी यांचे कार्यजबाबदाऱ्या आणि कर्तव्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले. या सादरीकरणाद्वारे शासन व्यवहारात मराठी भाषेचा प्रभावी वापर वाढविणे. तसेच अधिनियमाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींवर उपाय याबाबतही मार्गदर्शन केले.

सहा प्राध्यापक स्वप्निल जोशी यांनी मराठी भाषेतील विविध मनोरंजनात्मक खेळांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या वैविध्याचा आनंद दिला. सूत्रसंचालन वासंती काळे यांनी केले.

150 दिवस ई गर्व्हनन्स कार्यक्रमात कामगार विभाग अव्वल कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केले अधिकाऱ्यांचे अभिनंदन

 150 दिवस ई गर्व्हनन्स कार्यक्रमात कामगार विभाग अव्वल

कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केले अधिकाऱ्यांचे अभिनंदन

 

मुंबईदि. 27 : राज्य शासनाने 150 दिवसांचा ई गर्व्हनन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम शासकीय विभागसंचालकआयुक्तालयक्षेत्रीय कार्यालय आदींसाठी जाहीर केला. यामध्ये 3 हजारपेक्षा कमी मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांच्या प्रकारात 200 गुणांपैकी 185 गुण मिळवित कामगार विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. विशेष प्रशंसनीय वर्गवारीमध्ये विभागाला स्थान मिळाले आहे.

 

            कार्यालयीन मूल्यमापनात 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यकम अंतर्गत राज्यातील 68 सर्वोत्तम आयुक्तसंचालक प्रकारात कामगार विभागअंतर्गत कार्यरत बाष्पके संचालनालयाने चौथा आणि कामगार आयुक्तालयाने पाचवा क्रमांक पटकाविला आहे.  विभागाच्या या  उल्लेखनिय कामगिरीबद्दल कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात अधिकाऱ्यांचा सत्कार करीत त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी अधिकाऱ्यांनीही विभागप्रमुख म्हणून कामगार मंत्री फुंडकर यांचा सत्कार केला. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदनकामगार आयुक्त एच.पी तुम्मोडउपसचिव दीपक पोकळेउपसचिव स्वप्नील कापडणीसउपसचिव रोशनी कदमबाष्पके संचालनालयाचे संचालक  गजानन वानखडे आदी उपस्थित होते.


राष्ट्र प्रथमया अभियानांतर्गत पाच प्रमुख स्तंभांवर काम करण्याचे निश्चित

 राष्ट्र प्रथम अभियानांतर्गत पाच प्रमुख स्तंभांवर काम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षणाअंतर्गत ग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली 10 हजार प्रशिक्षकांमार्फत राज्यातील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येईल. मुलभूत सैनिकी प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रप्रेम रुजवण्यासाठी माजी सैनिक आणि एनसीसी कॅडेट्सच्या माध्यमातून संचलन (परेड)कवायत आणि मूलभूत सैनिकी शिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रथमसंस्कारमूल्यप्रबोधनशिक्षणाचे महत्वएकाग्रतामनोबलअभ्यासशुद्धबुद्धीविवेकतारतम्यसंवादमृदुवचनशब्द सामर्थ्यअहिंसाक्षमाकरुणादयालोकसंग्रहव्यवहारसमता आणि कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी सर्व जाती-धर्मातील 10 हजार प्रबोधनकार शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. यामध्ये वारकरी शिक्षण संस्था व विविध क्षेत्रांतील विचारवंतांचाही सहभाग असेल. योग प्रशिक्षणाअंतर्गत 'आर्ट ऑफ लिव्हिंगआणि त्र्यंबकेश्वर येथील योग संस्थांच्या मदतीने 10 हजार योग प्रशिक्षक विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि मनोबल वाढवण्यासाठी योग प्रशिक्षणाचे कार्य करतील. तर आरोग्य समुपदेशन (छत्रपती संभाजीनगर मॉडेल) करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करून संतुलित आहारपोषण मूल्य आहार सवयीचे महत्ववैयक्तिक स्वच्छतापरिसर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचे महत्व सांगितले जाईल. विशेषतः मोबाईलसंगणक व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे डोळेमेंदूझोप व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजवून सांगण्यासह विद्यार्थ्यांसाठी राज्यभर विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सूचित केले.

राष्ट्र प्रथम’अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम; शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर

 राष्ट्र प्रथमअभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम;

शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर

-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 

मुंबईदि. 27 : 'राष्ट्र प्रथमया संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षणमूलभूत सैनिकी  प्रशिक्षणप्रबोधनयोग प्रशिक्षण आणि आरोग्य समुपदेशन हे पाच उपक्रम आनंददायी शनिवार’ मध्ये विविध तासिकांमधून राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

'राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण आणि जीवन कौशल्यमिशन संदर्भात मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला प्रधान सचिव रणजित सिंह देओलशिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंहएनसीसी राज्य समन्वयक अधिकारी संतोष धाम आणि भोसलेग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाजआर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी राहुल पाटीलसमाज प्रबोधनकार अक्षय महाराज भोसले आणि सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे उमेश महाराज बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणालेकेवळ पुस्तकी ज्ञान न देतायेणारी पिढी शारीरिकदृष्ट्या सुदृढमानसिकदृष्ट्या सक्षम आणि संस्कारांनी समृद्ध असावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे अभियान राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्यात येणार असून यामुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाला एक नवी दिशा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेअंतर्गत हे अभियान राबविले जाणार आहे.

पायाभूत प्रकल्पांविषयी...

 पायाभूत प्रकल्पांविषयी...

·         छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता.

·         मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटरभूमिगत मार्ग 9.25 किलोमीटरउन्नत मार्ग 24.636 किमीएकूण 20 स्थानके6 स्थानके भूमिगत14 स्थानके उन्नत.  

·         छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके.

·          गोवंडी (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकापर्यंत उन्नत स्थानकेदोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर.

·         30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकताभूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मितीमार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटरया प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटीच्या खर्चास मान्यता. या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50 टक्के भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय.

 

गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे - कोनसरी - मूळचेरा - हेदरी - सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीस मान्यताचार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा महामार्ग.


Featured post

Lakshvedhi