150 दिवस ई गर्व्हनन्स कार्यक्रमात कामगार विभाग अव्वल
कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केले अधिकाऱ्यांचे अभिनंदन
मुंबई, दि. 27 : राज्य शासनाने 150 दिवसांचा ई गर्व्हनन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम शासकीय विभाग, संचालक, आयुक्तालय, क्षेत्रीय कार्यालय आदींसाठी जाहीर केला. यामध्ये 3 हजारपेक्षा कमी मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांच्या प्रकारात 200 गुणांपैकी 185 गुण मिळवित कामगार विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. विशेष प्रशंसनीय वर्गवारीमध्ये विभागाला स्थान मिळाले आहे.
कार्यालयीन मूल्यमापनात 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यकम अंतर्गत राज्यातील 68 सर्वोत्तम आयुक्त, संचालक प्रकारात कामगार विभागअंतर्गत कार्यरत बाष्पके संचालनालयाने चौथा आणि कामगार आयुक्तालयाने पाचवा क्रमांक पटकाविला आहे. विभागाच्या या उल्लेखनिय कामगिरीबद्दल कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात अधिकाऱ्यांचा सत्कार करीत त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी अधिकाऱ्यांनीही विभागप्रमुख म्हणून कामगार मंत्री फुंडकर यांचा सत्कार केला. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड, उपसचिव दीपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव रोशनी कदम, बाष्पके संचालनालयाचे संचालक गजानन वानखडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment