Monday, 26 January 2026

तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन

 तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन

नांदेड, 24 : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज दर्शन घेतले.

त्यांच्यासह आंध्रप्रदेश उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याणमहाराष्ट्र राज्याचे इतर मागास  बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेपर्यावरण मंत्री पंकजा मुंडेखासदार अशोक चव्हाणखासदार डॉ. अजित गोपछडेआमदार तुषार राठोडआमदार राजेश पवारआमदार बालाजी कल्याणकरअल्पसंख्याक आयोगाचे सदस्य चरणदीप सिंघ आदींनीही दर्शन घेतले.

गुरुद्वारा बोर्डाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सर्व मंत्रीलोकप्रतिनिधीमान्यवर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पद्म पुरस्कार 2026 जाहीर

 पद्म पुरस्कार 2026 जाहीर

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण

महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा गौरव

 

नवी दिल्ली, 25 : देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. कलाक्रीडाविज्ञानव्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रांतील योगदानसाठी 131 मान्यवरांना हे पुरस्कार यंदा जाहीर झाले असूनयामध्ये महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राला एक 'पद्म विभूषणतीन पद्म भूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. 

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे मानाचे पुरस्कार घोषित केले जातात. 2026 च्या पुरस्कांरासाठी कलाक्रीडाविज्ञानव्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा समावेश आहे. देशभरातून एकूण 131 मान्यवरांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून त्यात 5 पद्म विभूषण, 13 पद्म भूषण आणि 113  पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 19 महिला, 6 परदेशी अथवा अनिवासी भारतीय तसेच 16 व्यक्तींना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते  धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर 'पद्म विभूषणपुरस्कार जाहीर झाला आहे. पद्म भूषण श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील तीन मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक (कला)जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पीयूष पांडे (मरणोत्तर - कला) आणि बँकिंग क्षेत्रातील उदय कोटक (व्यापार व उद्योग) यांचा समावेश आहे.

पद्मश्री पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील 11 मान्यवरांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रातून क्रिकेटपटू रोहित शर्मावैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी श्रीमती आर्मिडा फर्नांडिससमाजसेवेसाठी जनार्दन बापूराव बोथे आणि कृषी क्षेत्रासाठी श्रीरंग देवाबा लाड यांचा समावेश आहे. कला क्षेत्रातून भिकल्या लाडक्या धिंडा, माधवन रंगनाथनरघुवीर तुकाराम खेडकर आणि सतीश शाह (मरणोत्तर) यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. तसेच व्यापार व उद्योग क्षेत्रातून अशोक खाडे व सत्यनारायण नुवाल आणि विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातून जुझेर वासी यांना हा सन्मान जाहीर झाला आहे.

येत्या मार्च-एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

00000

महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना 'जीवन रक्षा पदक' जाहीर

 महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना 'जीवन रक्षा पदकजाहीर

 

नवी दिल्ली,25: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025 च्या 'जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांना  अतुलनीय धैर्यासाठी 'जीवन रक्षा पदकजाहीर झाला आहे.

देशभरातील एकूण 30 व्यक्तींना यावर्षी जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहेत. यामध्ये 6  'सर्वोत्तम जीवन रक्षा पदक' (मरणोत्तर)6'उत्तम जीवन रक्षा पदकआणि 18 व्यक्तींना 'जीवन रक्षा पदकजाहीर झाले आहेत.

 

00000

 


गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीगुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हतेतर या देशाची संस्कृतीसभ्यताविचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते. त्यांचा पराक्रमवीरताशौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत एकत्र आला आहे. गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात धर्मस्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली. त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावायासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावातवाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहेअसे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.

हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा

 हिंद-दी-चादर गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून

मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा

                                                                        - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

- नांदेड येथे 'हिंद-दी-चादरश्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती

 

- श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

 

- श्री गुरु नानक देवजी यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे नऊ समाज प्रथमच लाखोंच्या संख्येने एकत्र

 

नांदेडदि.25 : 'हिंद-दी-चादरगुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला सत्यधर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची प्रेरणा देते. त्यामुळेच त्यांचे विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

        

नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित 'हिंद दी चादरश्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत  होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारआंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याणराज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेसहकारमंत्री  बाबासाहेब पाटीलनांदेडचे पालकमंत्री अतुल सावेनवी दिल्लीचे उद्योगअन्न व नागरी पुरवठा मंत्री सरदार मनजिंदर सिंघ सिरसामाजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाणखासदार डॉ.अजित गोपछडेखासदार डॉ. भागवत कराडआमदार प्रताप पाटील चिखलीकरआमदार बालाजी कल्याणकरआमदार श्रीजया चव्हाणआमदार जितेंद्र अंतापूरकरआमदार रवींद्र चव्हाणराज्य अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधीमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशीविभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरविशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेपोलिस अधीक्षक अबिनाश कुमारगुरूव्दारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबीर सिंघशहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यावेळी उपस्थित होते.

औद्योगिक व पायाभूत सुविधा विकास, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास प्रकल्प, जलसंधारण व पाणीपुरवठा योजना

 औद्योगिक व पायाभूत सुविधा विकास, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास प्रकल्प, जलसंधारण व पाणीपुरवठा योजना, तसेच आरोग्य सेवा बळकटीकरण आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीचे निर्णय या घोषणांतून शासनाचा विकासाभिमुख दृष्टिकोन स्पष्ट होतो.याशिवाय इलेक्ट्रिक वाहन धोरण, पर्यावरणपूरक उपक्रम, कौशल्य विकास व रोजगारनिर्मिती, नवीन तंत्रज्ञान,तसेच डिजिटल व स्मार्ट प्रशासन यावरही विशेष भर देण्यात आला आहे.


बैठकीत पेन्शन सुधारणा, निती आयोगाकडून एपीआय प्राप्ती, तृतीयपंथी व्यक्तींसाठी बीजभांडवल, रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि निवारा गृहांची स्थापना इत्यादीबाबत योजना तयार करणे, सुधारित विद्यार्थी हरीत सेना योजनेअंतर्गत "चला जाऊया वनाला" उपक्रम राबविणे, वाघ/बिबट गावात येताच नागरिकांना धोक्याची सूचना देण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारीत ड्रोन व आभासी भिंत यंत्रणा उभारणे, पाच हजार गिरणी कामगारांच्या घरांचे डिपीआर मंजूर करणे, विविध कार्पोरेशन आणि त्यांच्या उपकंपन्यांसाठी एक युनिर्व्हसल पोर्टल तयार करणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नाशिक- मुंबई राष्ट्रीय महामार्ग (भाग - ठाणे ते वडपे) सुधारणा करण्याचे कामामधील पूल व भूयारी मार्ग पूर्ण करणे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 13.30 कि.मी. मिसिंग लिंकचे काम पूर्ण करणे, पवनार ते पत्रा देवी (नागपूर-गोवा) शक्ती पीठ द्रुतगती महामार्ग भुसंपादन प्रक्रियेअंतर्गत संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण करणे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता खेळाडूंसोबत कोच व फिजिओथेरपिस्ट घेऊन जाण्यासाठी आर्थिक सहाय्य करणेबाबत शासन निधी किंवा सीएसआर मधून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी धोरण ठरविणे, नागरिकांना स्मार्ट शिधापत्रीका वितरीत करणे, ड्रोन धोरण निश्चित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण निश्चित करणे, प्रायोगिक तत्वावर दहा ठिकाणी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची सतत तपासणी (Real Time Monitoring) करण्याकरिता अत्याधुनिक यंत्रणा उभारणे, प्रस्तावित शिवसृष्टी थीम पार्क उच्चस्तरीय समिती व शिखर समितीची मान्यता या महत्वाच्या विषयांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेण्यात आला.

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागास निश्चित उद्दिष्टे व कालमर्यादा

 पर्यटनसार्वजनिक आरोग्य,वैद्यकीय शिक्षण,अन्न व  औषध प्रशासन,आदिवासी विकासपाणीपुरवठा व स्वच्छतामदत व पुनर्वसन,  महिला व बालविकासकौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यतामहसूलकृषी या  विभागांमध्ये ठोस कार्यवाही करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस  यांनी राज्यातील विविध कार्यक्रमदौरे व समारंभांदरम्यान केलेल्या घोषणांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. या आढाव्यानुसार ४८ घोषणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागास निश्चित उद्दिष्टे व कालमर्यादा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक प्रलंबित विषयांवरील कार्यवाही पूर्ण झाली असून उर्वरित मुद्द्यांवर काम सुरू आहे. विभागनिहाय कामकाजाची सद्यस्थितीअंमलबजावणीतील अडचणी तसेच आवश्यक सुधारणा यांचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला.


Featured post

Lakshvedhi