Saturday, 24 January 2026

बारमाही पाणी व्यवस्थापनासाठी झऱ्यांचे पुनरुजीवन, संवर्धन आवश्यक

 बारमाही पाणी व्यवस्थापनासाठी झऱ्यांचे पुनरुजीवनसंवर्धन आवश्यक

  • मृद  जलसंधारण सचिव गणेश पाटील 

 

मुंबईदि. 23 : स्वच्छ  शाश्वत बारमाही पाणी व्यवस्थेसाठी झरे हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेतविविध नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणांमुळे बरेच झरे आटत चालले आहेतआपली पाण्याची गरज मात्र दिवसेंदिवस वाढतच आहेत्यामुळे बारमाही पाणी व्यवस्थेसाठी झऱ्यांचे पुनर्भरण  संवर्धन आवश्यक असूनत्यासाठी महाराष्ट्र शासनाचा मृद  जलसंधारण विभाग लवकरच धोरण निश्चित करणार आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील यांनी व्यक्त दिली.

वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा व ग्रामपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी येथे आयोजित झऱ्यांचे व्यवस्थापन या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे तसेच पुणेसाताराकोल्हापूररायगडसिंधूदुर्गरत्नागिरीअहिल्यानगरनाशिकनंदुरबार या जिल्हयातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

झऱ्यांचे पुनर्जीवन  संवर्धन यासाठी जाणीवपूर्वक काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे या नवीन विषयात झोकून देऊन काम कराया विषयातील जाणकार बना आणि पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

यावेळी ॲक्वाडॅमचे संचालक डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील झऱ्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण याबाबत मार्गदर्शन केले. झरा हा भूजलाचा सर्वात पुरातन स्त्रोत असूनपाण्याचा हा स्त्रोत पर्यावरणपरक असल्यामुळे त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठीशासनया क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाज्ज्ञनाबार्ड आणि ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

शहरांतील ऑटो रिक्षा व टॅक्सींसाठी ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना

.

योजनेविषयी माहिती :

• मुंबई व महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील ऑटो रिक्षा व टॅक्सींसाठी ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे.

• ही योजना महाराष्ट्र मोटार वाहन विभाग तसेच मुंबई / महाराष्ट्र पोलीस विभाग यांच्या सहकार्याने, ETS360 सोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येत आहे.

• प्रवासी आसनासमोर तसेच चालकाच्या मागील बाजूस क्यूआर कोडसह चालक / वाहन ओळख पॅनल बसविण्यात आले आहे.

• दिग्सी अ‍ॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर गुगल मॅपवर वाहनाचा मार्ग दिसतो.

या अ‍ॅपमध्ये एसओएस बटन असून ते सक्रिय केल्यास वाहनचालक व प्रवासी यांची माहिती थेट पोलीस  नियंत्रण कक्ष ११२ येथे पाठवली जाते.

त्यानंतर जवळची गस्त घालणारी पोलीस व्हॅन वाहनाचा मागोवा घेऊन सुमारे ५ ते ६ मिनिटांत मदत उपलब्ध करून देते.

• मुंबई हे भारतातील असे तंत्रज्ञान सुरू करणारे पहिले शहर असूनमहाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

• ही सुविधा पुढीलप्रमाणे पूर्णतः मोफत उपलब्ध आहे.

– राज्य शासनासाठी कोणताही खर्च नाही

– चालकांसाठी कोणताही खर्च नाही

– नागरिकांसाठी कोणताही खर्च नाही

• या योजनेचा खर्च कॉर्पोरेट निधीदेणग्या व कॉर्पोरेट प्रायोजकत्वातून केला जात आहे.

• ही योजना २३ जानेवारी २०२६वसंत पंचमीदिनी अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.


शहरीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये

 

परिवहन आयुक्त भिमनवार म्हणाले कीशहरीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये कायम चिंता असते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर गंभीरपणे घेतला गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवासी वाहनात व्हेईकल लोकेशन अँड ट्रॅकिंग डिव्हाइस’ (व्हीएलटीडीव पॅनिक बटन बसवणे बंधनकारक करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्यूशनचे संस्थापक प्रा.भट्ट आणि त्यांच्या टीमने सामाजिक जबाबदारीतून कोणताही आर्थिक भार न टाकता महिलांना सुरक्षा देणारा पर्यायी उपाय विकसित केला. कोरोना काळातील अडचणीप्रशासकीय नियमांचा अभाव आणि तांत्रिक आव्हाने असूनही त्यांनी हार न मानता हा प्रकल्प पुढे नेला. परिवहन विभागपोलीस यंत्रणा आणि कमांड कंट्रोल सेंटरशी एकात्मता साधत हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात आला असल्याचे आयुक्त  भिमनवार यांनी सांगितले.

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी' अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

 144

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी

 ‘बीग्सीअभिनवखर्चमुक्त उपक्रम

- परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

 

मुंबईदि. २३ : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने बीग्सी हा अभिनव आणि खर्चमुक्त उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. एका सामाजिक जाणिवेतून सुरू झालेला हा प्रकल्प भविष्यात महिला सुरक्षेचा नवा अध्याय लिहीलअसा विश्वासही परिवहन आयुक्त भिमनवार यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र पोलीसमोटार परिवहन विभागवाहतूक पोलीस आणि इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्युशन यांच्या सहकाऱ्याने मुंबई तसेच राज्यभरातील काळी पिवळी टॅक्सी आणि ऑटोरिक्षाकरिता बीग्सी (बीवायजीएसवायया सेवेचा आरंभ परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सह परिवहन आयुक्त शैलेश कामतवाहतूकचे उपआयुक्त अजित बोगार्डेमुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील तसेच बीग्सीचे संस्थापक प्रोफ.निरंजन भट आदी उपस्थित होते.

संचलन पथकांचा सन्मान

 संचलन पथकांचा सन्मान

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिन संचलनातील सर्वोत्कृष्ट संचलन पथकांना यावेळी अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम क्रमांक राज्य राखीव पोलीस बल आणि द्वितीय क्रमांक बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक यांनी तर निशस्त्र दलांमध्ये बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलाने प्रथम क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी भजक आणि पल्लवी मुजुमदार यांनी केले. तर किरण शिंदेअरुण शिंदेविवेक शिंदे आणि कु.आराध्या शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले.

चित्ररथांचा सहभाग

 चित्ररथांचा सहभाग

अल्पसंख्याक विभागपाणी पुरवठा व स्वच्छता विभागमराठी भाषा विभागग्रामविकास व पंचायतराज विभागसहकारपणन आणि वस्त्रोद्योग विभागसार्वजनिक आरोग्य विभागकृषी विभागपर्यटन विभागसामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागसांस्कृतिक कार्य विभागआदिवासी विकास विभागअन्न व नागरी पुरवठा विभागइतर मागास बहुजन कल्याण विभागजलसंपदा विभागमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीशिक्षण शाखा वाहतूकमुंबईकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागगृहनिर्माण विभागउच्च व तंत्रशिक्षण विभागकामगार विभाग आणि वन विभागाच्या चित्ररथांनी संचलनात सहभाग घेतला.

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीम

 प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीम

 

मुंबईदि. 24 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली. राजशिष्टाचार विभागाच्या उप सचिव क्रांती पाटील यांनी ध्वजवंदन केले. यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेयविशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांच्या वतीने या रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदलगोवा पोलीसराज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दलबृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलगडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-60 पथकगृह रक्षक दल (पुरुष)बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलगृहरक्षक दल (महिला)राज्य उत्पादन शुल्क विभागवन विभाग: मुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलसुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हाराष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली)सी.कॅडेट कोअर (मुली)सी.कॅडेट कोअर (मुले)रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलदहिसर मुंबईरोड सेफ्टी पेट्रोल (मुले) सेंट पॉल हायस्कूलदादरमुंबईरोड सेफ्टी पेट्रोल (मुली) सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलदादरमुंबईरोड सेफ्टी पेट्रोल (मुले) डॉ.अँटोनिओ डा सिल्वा हायस्कूल दादरमुंबईरोड सेफ्टी पेट्रोलमनपा (मुली) वामनराव महाडिक उर्दू आणि पंतनगर मनपा इंग्रजी शाळाघाटकोपर (पूर्व)मुंबईरोड सेफ्टी पेट्रोल मनपा (मुले) जी.व्ही. स्कीम मुलुंड आणि क.दा. गायकवाड हिंदी शाळासायन भोईवाडामुंबईभारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुली)भारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुले)स्टुडंट पोलीस कॅडेट (मुले/मुली) पुणे विद्याभवन पंतनगर आणि शिवाजी टेक्निकल स्कूल पंतनगरमुंबई यांच्यासह पाईप बँडमहिला पाईप बँडब्रास बँड पथकअश्वदल पोलीस पथक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे भारतीय नौदलबृहन्मुंबई पोलीस दलमहिला निर्भया पथक आणि बृहन्मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनांनी संचलनात सहभाग घेतला. नौदलाचे कमांडर पंकज बघेल हे संचलन प्रमुख होते.

Featured post

Lakshvedhi