Friday, 23 January 2026

जनगणना 2027' अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर

 जनगणना 2027अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे

वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर

        • शासकीय अधिसूचना जारी

 

नवी दिल्ली23 : देशातील 'जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात 'घरयादीआणि 'गृहगणनाकेली जाणार असूनयासाठी सरकारने 33 प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार 30 दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

 

या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकीघराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (छप्परमजला इ.) याबद्दल माहिती घेतील. तसेच कुटुंबातील व्यक्तींची संख्याकुटुंब प्रमुखाचे नावलिंग आणि प्रमुखाची जात (अनुसूचित जातीअनुसूचित जमाती किंवा इतर) याविषयीचे प्रश्न विचारले जातील. घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहेस्वयंपाकासाठी एलपीजी किंवा पीएनजी जोडणी, विजेची व्यवस्थासांडपाणी निचराशौचालयाची उपलब्धता आहे कायाचीही नोंद केली जाणार आहे.

 

आधुनिक जीवनशैलीचा आढावा घेण्यासाठी यावेळी नागरिकांकडील इलेक्ट्रॉनिक साधनांचीही माहिती घेतली जाईल. यामध्ये रेडिओटेलिव्हिजनइंटरनेट सुविधालॅपटॉपसंगणकटेलिफोन आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे. त्यासोबतच कुटुंबाकडे कोणते वाहन आहे आणि आहारात कोणत्या मुख्य धान्याचा वापर होतोहे देखील प्रगणक विचारतील.

 

            जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल. विशेष म्हणजेप्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वी 15 दिवस नागरिकांना 'स्व-गणनाकरण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतरफेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ

 मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ

 

मुंबईदि. २३ : देशभर राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय मतदार दिन रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी आहे. २३ जानेवारी रोजी मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली.

            २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणूक आयोगामार्फत देशामध्ये निष्पक्ष व पारदर्शकरित्या निवडणूकांचे संचालन करण्यात येते. २०११ पासून भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे.

मंत्रालयात आयोजित मुख्य सचिव कार्यालयाचे सह सचिव मकरंद देशमुखसह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्यासह  अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई में सर्क्युलर इकॉनॉमी का विकास

 

मुंबई में सर्क्युलर इकॉनॉमी का विकास

मुंबई में सर्क्युलर इकॉनॉमी मॉडल विकसित किया जाएगाजिसके माध्यम से पानीहवा और कचरा प्रबंधन से जुड़े प्रमुख मुद्दों का समाधान किया जाएगा। सभी प्रकार के कचरे का वैज्ञानिक तरीके से प्रसंस्करण सुनिश्चित किया जाएगा। आगे चलकर इस मॉडल को राज्य के अन्य बड़े शहरों में भी लागू किया जाएगा। अगले से वर्षों में मुंबई में इसके ठोस परिणाम दिखाई देंगेऐसा मुख्यमंत्री ने कहा।

उन्होंने यह भी बताया कि रायगढ़पेण ग्रोथ सेंटर की घोषणा भी दावोस में की गई है। इससे एक प्रमुख बिजनेस डिस्ट्रिक्ट विकसित होगा और इस परियोजना के लिए ₹1 लाख करोड़ का निवेश पहले ही प्राप्त हो चुका है

 

महाराष्ट्र की सौर ऊर्जा क्षेत्र में प्रगति की सराहना की। इस अवसर

 

अन्य महत्वपूर्ण बैठकें

·         जिम्बाब्वे के विदेश और अंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री प्रो. एमोन मुरवीरा ने एक सम्मेलन में महाराष्ट्र की सौर ऊर्जा क्षेत्र में प्रगति की सराहना की। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित थे।

·         मुख्यमंत्री ने एलन ट्यूरिंग इंस्टिट्यूट के मिशन निदेशक एडम सोबे से मुलाकात कर परिवहन क्षेत्र में कार्बन उत्सर्जन कम करने और भविष्य उन्मुख स्वच्छ उपायों पर चर्चा की।

·         इसके अलावा अरुप समूह की अध्यक्ष हिल्डे टोन के साथ शहरी विकास के विभिन्न पहलुओं तथा इंडो-इटालियन चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री के अलेसांद्रो गिउलियानी के साथ आपसी सहयोग बढ़ाने पर चर्चा हुई।

0000


त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीस 4 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीस 4 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

मुंबईदि. 22 :- राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 जून, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला, या समितीच्या कार्यकाळास दि. 5 जानेवारी पासून दि. 4 फेब्रुवारी, 2026 या कालावधीसाठी (एक महिना) मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

 

या समितीस दि. 15 डिसेंबर 2025 च्या शासन निर्णयान्वये दि. 5 डिसेंबर, 2025 ते 4 जानेवारी, 2026 या कालावधीकरिता एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि समितीचे कामकाजाप्रित्यर्थ समितीच्या संकेतस्थळावर विविध जनसामान्यांमार्फत प्राप्त प्रश्नावली व मतावलीद्वारे प्राप्त प्रतिसाद यावर विचारविमर्श व पुढील विश्लेषण करण्याच्या कार्यवाहीसाठी आता 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, यांनी दि2 जानेवारी, 2026 रोजीच्या पत्रान्वये सद्यस्थितीतील सुरू असलेल्या इतर कामकाजाच्या अनुषंगाने समितीच्या कार्यकाळास मुदतवाढ मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. तसेच समितीस एक महिन्याची मुदतवाढ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत कळविले होते. त्यास अनुसरून त्रिभाषा धोरण समितीच्या कार्यकाळास एक महिना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज

 संस्कृतीमराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज

-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

 

  • पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ३ दिवसीय "व्याख्यानमाला"

 

मुंबईदि. २२: सार्वजनिक उत्सवव्याख्यानमाला आणि सांस्कृतिक उपक्रम हे समाजसंस्कृतीराष्ट्र आणि एकता यांना एकत्र आणणारे प्रभावी माध्यम आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दीर्घ परंपरेप्रमाणेच बौद्धिक समृद्धी देणाऱ्या व्याख्यानमालांची परंपरा शासनाने पुढे नेण्याचा निर्णय घेतला असूनत्यातील हा पहिला उपक्रम आहेअसे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्यमंदिर येथे झाला. या व्याख्यानमालेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकरज्येष्ठ लेखकविचारवंत आणि अभ्यासक अच्युत गोडबोलेसल्लागार समितीचे सदस्यडॉ. शिरीष ठाकूर आणि सोनिया परचुरे यावेळी उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीआज प्रत्येक नागरिकाचा तंत्रज्ञानाशी थेट संबंध आहे. मोबाईलसोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे मोठ्या प्रमाणावर माहिती संकलित होत असूनया तंत्रज्ञानाचा योग्यसुरक्षित आणि सकारात्मक वापर कसा करायचा हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या विषयावर अच्युत गोडबोले यांच्यासारख्या अभ्यासू वक्त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेलअसेही त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या सक्रिय प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला. महाराजांची रयतेचा राजा’ आणि उपभोगशून्य स्वामी’ ही संकल्पना जागतिक स्तरावर मांडण्यात महाराष्ट्राला यश आलेयाचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर साहित्यलोककलालोकसंगीतविज्ञानतंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांतील मराठी निर्मितीला चालना देण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. राज्यात वर्षभरात १२०० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जात असूनही महाराष्ट्राची सांस्कृतिक सॉफ्ट पॉवर’ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक श्रीमती मीनल जोगळेकर म्हणाल्या कीगणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यभर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून व्याख्यानमाला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

या व्याख्यानमालेंतर्गत ज्येष्ठ लेखकविश्लेषक व अभ्यासक अच्युत गोडबोले 'ए आय तंत्रज्ञान व कलाविश्व' या विषयावर संवाद साधला. २३ जानेवारी रोजी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या युनेस्को नामांकनाचा रोमांचक प्रवासआणि २४ जानेवारी रोजी मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी अभिजात मराठी : इतिहास वर्तमान व भविष्य या विषयांवर संवाद साधणार आहेत. 

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

  

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी

दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

  • मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

 

नवी दिल्ली, दि. 22: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  बैठकीत महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकासाबाबत आणि कोळंबी उत्पादकांच्या समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

Featured post

Lakshvedhi