Thursday, 22 January 2026

महाराष्ट्र विधिमंडळ : उत्तरदायित्वाचा आदर्श…

 महाराष्ट्र विधिमंडळ : उत्तरदायित्वाचा आदर्श

महाराष्ट्र विधानमंडळाच्या संसदीय परंपरांचा उल्लेख करताना प्रा. शिंदे यांनी लोकलेखा समिती आणि अंदाज समिती यासारख्या देखरेख यंत्रणांच्या भूमिकेवर भर दिलाज्या सार्वजनिक खर्चावर कठोर नियंत्रण ठेवतात. कायदे निर्मितीत जनसहभागाला महाराष्ट्राने दिलेले महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी महाराष्ट्र सार्वजनिक सुरक्षा विधेयकाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या एक लाखांहून अधिक जनसूचना तपासूनच कायदा अंतिम करण्यात आल्याचे उदाहरण दिले. कायद्यांच्या निर्मितीत नागरिकांचा सहभाग वाढल्याशिवाय खरी उत्तरदायित्वाची सुरुवात होत नाही, असे ते म्हणाले.

भारतीय संविधानिक व सांस्कृतिक परंपरेत रुजलेली उत्तरदायित्वाची संकल्पना…

 भारतीय संविधानिक व सांस्कृतिक परंपरेत रुजलेली उत्तरदायित्वाची संकल्पना

महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा संदर्भ देताना प्रा. शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेचा उल्लेख केलाज्यामध्ये प्रजेचे कल्याण हे राज्यकारभाराच्या (लोककल्याणकारी राज्य) केंद्रस्थानी होते. तसेच महात्मा  जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांचा संदर्भ देतलोकप्रतिनिधी हे केवळ निवडून आलेले पदाधिकारी नसूनजनतेच्या आकांक्षांचे विश्वस्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उत्तरदायित्व ही निवडणुकीपुरतीपाच वर्षांतून एकदा येणारी औपचारिक प्रक्रिया नाही. ती प्रत्येक तासाचीप्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी विधिमंडळांतील बेशिस्त आणि गोंधळ यामुळे जनतेचा विश्वास डळमळीत होतोअसा इशारा दिला.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 2020 मध्ये केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देतानाप्रा. शिंदे यांनी सांगितले कीविधिमंडळे ही जनतेच्या आकांक्षांची मंदिरे’ आहेत आणि लोकशाहीची ताकद सभागृहातील चर्चेची गुणवत्ता व उत्तरदायित्वात प्रतिबिंबित होते. (एआयपीओसी) आणि P20 (G20 स्पीकर्स समिट) सारख्या मंचांद्वारे सुधारणा प्रक्रियेला दिशा मिळत आहे.

 

लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया - 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन

 लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया

- 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन


उत्तरदायित्व केवळ निवडणुकीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही; ती प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी…

विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे;

गडबड-गोंधळासाठीचे नव्हे…

लखनौ, उत्तर प्रदेश 20 जानेवारी : लोकप्रतिनिधींचे जनतेप्रती उत्तरदायित्व ही केवळ नैतिक अपेक्षा नसून, सशक्त आणि गतिमान लोकशाहीसाठीची एक अनिवार्य कार्यात्मक गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. लखनौ येथे आयोजित 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या (एआयपीओसी) व्यासपीठावर ते बोलत होते.


परिषदेच्या “जनतेप्रति विधिमंडळांचे उत्तरदायित्व” या विषयावर विचार मांडतांना सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि लोकशाही संस्थांची अधिमान्यता केवळ निवडणुकीद्वारे मिळत नाही, तर सातत्यपूर्ण पारदर्शकता, नैतिक आचरण आणि जनतेच्या आकांक्षांप्रती संवेदनशीलतेतून ती दृढ होत जाते.                                                                                                                                                                                                                               

लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती तसेच देशभरातील पीठासीन अधिकारी उपस्थित असलेल्या या गौरवशाली संमेलनास त्यांनी ‘अमृत काळा’तील सामूहिक आत्मपरीक्षणाचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ असे संबोधले.


 

हिंद-दी-चादर’ शहीदी समागमासाठी नांदेडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज १० लाखांहून अधिक भाविकांसाठी ५ दिवस व्यापक वैद्यकीय सेवा

 हिंद-दी-चादर’ शहीदी समागमासाठी नांदेडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज

  • १० लाखांहून अधिक भाविकांसाठी ५ दिवस व्यापक वैद्यकीय सेवा

 

नांदेडदि. २१: शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम- हिंद-दी-चादर शताब्दी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असूनलाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत काटेकोरबहुस्तरीय व समन्वयित वैद्यकीय व्यवस्थापन उभारण्यात आले आहे.

 

२४ व २५  जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरात होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून १० लाखांपेक्षा अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२ ते २६ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत अखंड आरोग्य सेवा उपलब्ध असणार आहे.

जब अन्याय के खिलाफ सभी प्रयास किये गये हो,

 जब अन्याय के खिलाफ सभी प्रयास किये गये होन्याय का मार्ग अवरुद्ध होतब तलवार उठाना सही है" (जेव्हा अन्यायाचा प्रतिकार करण्याचे शांततेचे सर्व मार्ग बंद होताततेव्हा हाती तलवार घेणे हेच उचित व धर्मसंमत ठरते). विशेष म्हणजेभाई दया सिंगजींनी हे पत्र दिल्यावर खुद्द औरंगजेबाने त्याचा सकारात्मक स्वीकार केला होता व गुरूजींना सन्मानाने भेटीसाठी आमंत्रित करणारे शाही पत्र जारी केले होतेअशी साक्ष येथील इतिहास देतो.

 

भाई दया सिंगजींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी शीख समाजासाठी अत्यंत पवित्र असूनती एका ऐतिहासिक पर्वाची साक्ष देत उभी आहे. हे स्थान केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसूनभारतीय इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाचे व गुरु गोविंदसिंगजींच्या सर्वोच्च नीतिमत्तेचे प्रतीक आहे. हा अमूल्य ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणास्त्रोत ठरेल.

याच पवित्र भूमीवर, भाई दया सिंगजींच्या चरणांनी पावन झालेल्या जागेचा विकास अहिल्यानगर येथील शीख

 याच पवित्र भूमीवरभाई दया सिंगजींच्या चरणांनी पावन झालेल्या जागेचा विकास अहिल्यानगर येथील शीख समाजाने श्रद्धेने व स्वखर्चाने केला. आज ती जागा गुरुद्वारा भाई दया सिंगजी साहिबगोविंदपुराअहिल्यानगर म्हणून ओळखली जाते.

 

गुरु गोविंदसिंगजींनी हे पत्र मूळ पर्शियन (फारसी) भाषेत लिहिले असून त्यात एकूण १११ कडवी (शेर) आहेत.'झफरनामाम्हणजे केवळ एक पत्र नसून ती अन्यायाविरुद्ध पुकारलेली नैतिक विजयाची ललकारी होती. या पत्रात गुरूजींनी चमकौरचे युद्धआपल्या पुत्रांचे बलिदान व औरंगजेबाच्या सैन्याने पवित्र कुराण पाठवुन दिलेले शब्द न पाळता केलेला विश्वासघातयावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. याच पत्रात शीख इतिहासातील प्रसिद्ध ओळ नमूद आहे - कुन् कर अझ हमेह् हील्-ते दार गुज़श्त,

हलाल अस्त बुर्दन बा शमशेर दस्त ||२२||


अहिल्यानगर येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजी' शीख इतिहासातील 'झफरनामा' या महत्त्वपूर्ण अध्यायाचा साक्षीदार !

 अहिल्यानगर येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजीशीख इतिहासातील 'झफरनामाया महत्त्वपूर्ण अध्यायाचा साक्षीदार !

 

अहिल्यानगरदि. २१ - नांदेड येथे 'हिंद दी चादरश्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम पर्वाच्या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाचमहाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशात मोलाची भर घालणाऱ्या अहिल्यानगर शहराला लाभलेल्या शीख इतिहासाच्या एका अत्यंत महत्वपूर्ण पर्वावर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त ठरते. गोविंदपुरा येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजीहे स्थान शीख इतिहासातील 'झफरनामाया निर्णायक घटनेचा थेट साक्षीदार मानले जाते.

 

इतिहासाच्या पानांवर कोरलेली ही महत्त्वपूर्ण घटना १८ व्या शतकाच्या सुरुवातीची (सन १७०५-०६) आहे. शीख धर्माचे दहावे गुरुश्री गुरु गोविंदसिंगजी महाराज यांनी स्वतःच्या वडिलांचे व पुत्रांचे मारेकरी ठरलेल्या  तत्कालीन मुघल बादशहा औरंगजेब याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र पाठविले होतेजे इतिहासात 'झफरनामा' (विजयाचे पत्र) म्हणून ओळखले जाते. हे ऐतिहासिक पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचविण्याची अत्यंत महत्त्वाची व जोखमीची जबाबदारी गुरु गोविंदसिंगजींनी 'पंच प्याऱ्यांपैकी एक असलेल्या 'भाई दया सिंगजीयांच्यावर सोपविली होती

Featured post

Lakshvedhi