‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमासाठी नांदेडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज
- १० लाखांहून अधिक भाविकांसाठी ५ दिवस व्यापक वैद्यकीय सेवा
नांदेड, दि. २१: शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम- हिंद-दी-चादर शताब्दी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत काटेकोर, बहुस्तरीय व समन्वयित वैद्यकीय व्यवस्थापन उभारण्यात आले आहे.
२४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरात होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून १० लाखांपेक्षा अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२ ते २६ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत अखंड आरोग्य सेवा उपलब्ध असणार आहे.
No comments:
Post a Comment