Wednesday, 21 January 2026

हिंद दी चादर’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज

 हिंद दी चादर’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज

-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी असरजन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५२ एकर मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाहमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथआंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्रीसंत-महंत उपस्थित राहणार आहेतअशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने मैदानावर युद्धपातळीवर काम सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली असूनमैदानालगत दोन भव्य टेन्ट सिटी उभारण्यात आल्या आहेत. एका टेन्ट सिटीत सुमारे १४ हजार भाविकांची निवास क्षमता असूनयासोबतच शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमस्थळी स्वच्छतास्वयंसेवक व्यवस्थाविविध प्रकारचे मोफत सेवा स्टॉल्सतसेच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५० हजार नेत्र तपासणी व विशेष कर्करोग तपासणी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

भाविकांसाठी भव्य लंगर व्यवस्था करण्यात आली असूनयाचा लाभ सुमारे १० लाख भाविकांना घेता येणार आहे. निवासभोजनवाहतूकआरोग्य व सुरक्षा याबाबत सर्व विभाग समन्वयाने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आतापर्यंत करण्यात आलेल्या व पुढील कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्रचारप्रसिद्धी उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा

 शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा

– अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम

कार्यक्रमाची आढावा बैठक

नांदेडदि. २० :- हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावायासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानेकाटेकोर नियोजनासह जबाबदारीने काम करावेअसे निर्देश नगरविकासपरिवहनसामाजिक न्यायवैद्यकीय शिक्षणअल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

नांदेड येथे होणाऱ्या या शताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या आयोजनाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीराज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकसमिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंगविभागीय माहिती उपसंचालकजिल्हा माहिती अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या कीकार्यक्रमस्थळी पुरेसे पिण्याचे पाणीस्वच्छ व पर्याप्त शौचालय व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी. कार्यक्रमाची प्रचारप्रसिद्धी व्यापक प्रमाणात करण्यात यावी. स्थानिक स्तरावर होणाऱ्या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आवश्यक असून सोशल मीडियाइलेक्ट्रॉनिक मीडिया व मुद्रित माध्यमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जावीअसेही निर्देश त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व प्रेरणा निर्माण व्हावीयासाठी शाळा स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करावी. तसेच सिनेमागृहांमध्ये भक्तिगीत प्रसारित करणेप्रत्येक जिल्ह्यात होर्डिंग्ज लावून कार्यक्रमाचा संदेश पोहोचवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यक्रमास महिलाज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना सहज सहभागी होता यावेयासाठी पार्किंग क्षेत्रापासून कार्यक्रमस्थळापर्यंत योग्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर सादरीकरण · पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली राज्य शासनाची भूमिका

 राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर सादरीकरण

·     पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली राज्य शासनाची भूमिका

नवी दिल्लीदि. 20 : महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक पुढाकार घेत 'राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणस्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली होती. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भातील प्रस्तावाचे सादरीकरण केले. या प्राधिकरणास मंजुरी मिळाल्यास ते देशातील पहिले प्राधिकरण ठरणार असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

या  विशेष बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील जल आणि पर्यावरण प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा केली. नद्यांच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या मदतीसोबतच राज्याची स्वतःची एक स्वतंत्र यंत्रणा आणि नियोजन असणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. देशातील अनेक नद्या विविध राज्यांतून प्रवाहित होतात. जर प्रत्येक राज्याने आपल्या भौगोलिक सीमेतील नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी व सुनियोजित योजनांची अंमलबजावणी केलीतर नद्यांचे पूर्णतः प्रदूषणमुक्त करण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकेल असे मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.  या प्रक्रियेमुळे भविष्यात नद्यांचे पावित्र्य आणि त्यांची नैसर्गिक प्राकृतिकता टिकवून ठेवण्यात देशाला मोठे यश मिळेलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रस्तावावर केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्राने याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल विशेष कौतुक केले आणि यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस राष्ट्रीय नदी संरक्षण संचलनालयाचे (एनआरसीडीसंचालक राजेश कुमारमहाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज यांसह केंद्र व राज्यातील इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर सादरीकरण

महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योगव्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदारउद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ आणखी वाढला आहे.

सामंजस्य करार पुढीलप्रमाणे...

महाराष्ट्र सरकार-काल्सबर्ग

क्षेत्र: अन्न प्रक्रिया आणि कृषी

गुंतवणूक: ५०० कोटी

रोजगार : ७५०

महाराष्ट्र सरकार- योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.

क्षेत्र: नविनिकरणीय ऊर्जा

गुंतवणूक: ४ हजार कोटी

रोजगार : ६ हजार

ठिकाण: पालघर/एमएमआर

महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स

क्षेत्र: स्टील

गुंतवणूक: ५६५ कोटी

रोजगार : ८४७

ठिकाण: पालघर/एमएमआर

एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी

गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स

रोजगार : ८० हजार.

एमएमआरडीए-के. रहेजा

गुंतवणूक: सुमारे १० बिलियन डॉलर्स

रोजगार : एक लाख.

एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशील

गुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्स

रोजगार : २ लाख ५० हजार.

एमएमआरडीए-एसबीजी समूह

क्षेत्र: लॉजिस्टिक्स

गुंतवणूक: सुमारे २० बिलियन डॉलर्स

रोजगार : ४ लाख ५० हजार.

एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबल

गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स

रोजगार : ८० हजार.

एमएमआरडीए-जायका

धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर

एमएमआरडीए-सेम्बकॉर्प डेवलपमेंट लि. सिंगापूर

एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर

एमएमआरडीए-टेक्निकल युनिव्हर्सिटीमुनीचजर्मनी

शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली

महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात

क्षेत्र: स्टील

गुंतवणूक: २० हजार कोटी

रोजगार: ८ हजार.

ठिकाण: गडचिरोली

महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्स

क्षेत्र: आयटीडेटा सेंटर्स

गुंतवणूक: १ लाख कोटी

रोजगार: १ लाख ५० हजार.

ज्यांनी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणि विस्तार करण्याची तयारी दर्शवली असे: कोकाकोलाआयकियास्कोडा ऑटो.

याशिवायकार्लसबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूकीला पोषक वातावरणाचे कौतुक करताना राज्याच्या उद्योग धोरणाला दाद दिली. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्यासाठी प्रय़त्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोका-कोला कंपनीचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्या समेवत देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली.

००००

Tuesday, 20 January 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योगव्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदारउद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ आणखी वाढला आहे.

एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी

गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स

रोजगार : ८० हजार.

एमएमआरडीए-के. रहेजा

गुंतवणूक: सुमारे १० बिलियन डॉलर्स

रोजगार : एक लाख.

एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशील

गुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्स

रोजगार : २ लाख ५० हजार.

एमएमआरडीए-एसबीजी समूह

क्षेत्र: लॉजिस्टिक्स

गुंतवणूक: सुमारे २० बिलियन डॉलर्स

रोजगार : ४ लाख ५० हजार.

एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबल

गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स

रोजगार : ८० हजार.

सामंजस्य करार पुढीलप्रमाणे... क्रमांक ३

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योगव्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदारउद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ आणखी वाढला आहे.

सामंजस्य करार पुढीलप्रमाणे... क्रमांक ३

महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स

क्षेत्र: स्टील

गुंतवणूक: ५६५ कोटी

रोजगार : ८४७

ठिकाण: पालघर/एमएमआर

Featured post

Lakshvedhi