Wednesday, 21 January 2026

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा

 शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा

– अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम

कार्यक्रमाची आढावा बैठक

 

नांदेडदि. २० :- हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावायासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानेकाटेकोर नियोजनासह जबाबदारीने काम करावेअसे निर्देश नगरविकासपरिवहनसामाजिक न्यायवैद्यकीय शिक्षणअल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

नांदेड येथे होणाऱ्या या शताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या आयोजनाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीराज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकसमिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंगविभागीय माहिती उपसंचालकजिल्हा माहिती अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या कीकार्यक्रमस्थळी पुरेसे पिण्याचे पाणीस्वच्छ व पर्याप्त शौचालय व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी. कार्यक्रमाची प्रचारप्रसिद्धी व्यापक प्रमाणात करण्यात यावी. स्थानिक स्तरावर होणाऱ्या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आवश्यक असून सोशल मीडियाइलेक्ट्रॉनिक मीडिया व मुद्रित माध्यमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जावीअसेही निर्देश त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व प्रेरणा निर्माण व्हावीयासाठी शाळा स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करावी. तसेच सिनेमागृहांमध्ये भक्तिगीत प्रसारित करणेप्रत्येक जिल्ह्यात होर्डिंग्ज लावून कार्यक्रमाचा संदेश पोहोचवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यक्रमास महिलाज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना सहज सहभागी होता यावेयासाठी पार्किंग क्षेत्रापासून कार्यक्रमस्थळापर्यंत योग्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिसाळ

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi